Marmik
Hingoli live

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यात घोषित झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका व आगामी सण व उत्सव या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी जिल्ह्यात कलम 37 एक तीन चे आदेश लागू करण्यात आले आहेत यानुसार पाच किंवा अधिक व्यक्ती रस्त्यावर जमण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीचे मतदान दि. 18 डिसेंबर, 2022 रोजी व मतमोजणी दि. 20 डिसेंबर, 2022 रोजी होणार आहे. दि. 25 डिसेंबर, 2022 रोजी ख्रिसमस सण साजरा करण्यात येतो. तसेच सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय, जातीय घडामोडी तसेच नागरिकांच्या वतीने, विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे त्यांच्या विविध मागण्या संदर्भात मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे, निदर्शने, विविध प्रकारची आंदोलने करीत असतात. अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा  प्रश्न निर्माण  होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 14 डिसेंबर, 2022 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 28 डिसेंबर, 2022 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत.

कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही.

सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे.

हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related posts

Hingoli घोरदरी येथील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू

Jagan

शिक्षण विभागाने जिल्हाभरातील शाळा तंबाखूमुक्त कराव्यात; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Santosh Awchar

जिजामाता नगर मधील गुन्हेगार एका वर्षासाठी स्थानबद्ध; डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची एमपीडीए अंतर्गत नववी कार्यवाही

Santosh Awchar

Leave a Comment