मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी:-
छत्रपती संभीजीनगर - श्री.१००८ संभवनाथ दिगंबर जैन मंदिर बजाजनगर पंढरपुर मंदिराच्या १२ व्या वर्धापन दिवसा निमीत्त्त दि. ४ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे.आचार्य हेमसागर महाराज व आचार्य सुविसागर महाराज यांच्या प्रेरणेने हा कार्यकम आयोजीत करण्यात आला आहे.
सर्व प्रथम सकाळी ७ वाजता भव्य शोभायात्रा, सकाळी ८ वाजता कल्याणमल संदीप,योगेश कासलीवाल परिवार आडुळवाला यांच्या वतीने धर्मध्वजारोहन होउन कार्यकमाची सुरुवत रण्यात येणार आहे. तदनंतर ८.३० वाजता भगवंताचा पंचामृत अभिषेक करण्यात येणार आहे.
यावेळी सौधर्म इंद्र इंद्राणी होण्याचा मान योगीता महावीर पांडे यांना मिळाला आहे. तर इंद्र म्हणुन डॉ.वंदना राजेंद्र काला, प्रिती सुजीत गोधा, सोनल सचिन पाटणी, पुजा अतुल चुडीवाल, सपना सुदेश अजमेरा, समता तुषार साहुजी यांना मिळाला आहे. कार्यकमासाठी प्रमुख अतिथी म्हणुन केद्रीय अर्थमंत्री भागवत कराड, आ.अतुल सावे, आ.संजय शिरसाठ, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हा सरचिटणीस अनिल चोरडिया, सरपंच सुनिल काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तसेच दुपारी २ वाजता संगीतमय भक्तांबर विधान व संध्याकाळी ७ वाजता संगीतमय महाआरती व भजनसंध्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित भाविकांना अनिता महावीर संंकेत कासलीवाल परिवार खराडीवाला व संतोष मनोज स्वप्नील अक्षद कासलीवाल परिवार बजाजनगर यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात येणार आहे.
समाज बांधवांनी वरील कार्यकमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष डॉ.राजेंद्र काला,सचिव सुचित गोधा,उपाध्यक्ष अतुल चुडीवाल,कोषाध्यक्ष सुदेश अजमेरा, सदस्य दिपक काला, महावीर पांडे, सचिन पाटणी, योगेश कासलीवाल, सुनिल पांडे, जीवन गंगवाल, सल्लागार डॉ.सुरेश बडजाते, रविंद्र ठोले संदीप बाकलीवाल सकल जैन समाज बजाजनगर पंढरपुर,वाळुज,सिडको महानगर १ यांनी केले आहे अशी माहीती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा, पियुष कासलीवाल डॉ.राजेंद्र काला अध्यक्ष यांनी दिली.