मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – राष्ट्रीय ज्युनिअर व सबज्युनिअर नेहरु कप हॉकी क्रीडा स्पर्धा-2022 या दि. 02 सप्टेंबर ते 09 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत शिवाजी स्टेडियम, नवी दिल्ली येथे आयोजित होणार आहेत.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली द्वारा सन सन 2022-23 या वर्षात जिल्हास्तरीय शालेय नेहरु कप हॉकी स्पर्धेचे आयोजन येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर दि. 11 व 12 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
स्पर्धेची प्रवेशिका दि. 8 ऑगस्ट, 2022 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा मक्ता ता.जि.हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येतील. प्रवेशिका दाखल करतांना प्रवेशिकेसोबत खेळाडूंचे परिपूर्ण भरलेले ओळखपत्र, आधारकार्ड, जन्म दाखला इत्यादी असणे आवश्यक आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 15 वर्षे मुले (सब ज्युनिअर) या वयोगटातील खेळाडूंचा जन्म दि. 01 नोव्हेंबर, 2007 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. 17 वर्षे मुले व मुली (ज्यूनिअर) या वयोगटातील खेळाडूंचा जन्म दि. 01 नोव्हेंबर, 2005 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. 15 वर्ष मुले (सब ज्युनिअर) , 17 वर्षे मुले (ज्युनिअर) व 17 वर्षे मुली (ज्युनिअर) या तिन्ही गटासाठी प्रती गट 16 याप्रमाणे खेळाडूंची संख्या आहे.
या स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील खेळाडू व संघानी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.