हिंगोली : संतोष अवचार
सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस् एजन्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली व्दारा सन 2022-23 या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या 61 व्या आंतरराष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी फुटबॅाल कप (सबज्युनिअर / ज्युनिअर) क्रीडा स्पर्धेचे दि. 01 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर, 2022 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले आहे.
हिंगोली येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2022-23 या वर्षात जिल्हास्तरीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॅाल कप स्पर्धेचे आयोजन आदर्श महाविद्यालय, हिंगोली येथे दिनांक 12 व 13 जुलै, 2022 रोजी करण्यात आले आहे. जे संघ सुब्रतो मुखर्जी फुटबॅाल स्पर्धेत सहभागी होणार आहेत, अशा सर्व संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वीच www.subrotocup.in या संकेतस्थळावर दि. 09 जुलै, 2022 पर्यंत खेळाडू तसेच संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 14 वर्षाखालील मुले (सब ज्युनिअर) या वयोगटातील खेळाडूंचा जन्म दि. 04 जानेवारी, 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. 17 वर्षाखालील मुले व मुली (ज्यूनिअर) या वयोगटातील खेळाडूंचा जन्म दि. 01 जानेवारी, 2006 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.या स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील खेळाडू व संघानी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कलीमओद्दीन फारुखी यांनी केले आहे.