मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर - शहरापासुन १२ कि.मी.अंतरावर असलेल्या हजारो जैन बांधवांचे श्रध्दास्थान श्री.१००८ संकटहर पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र जैनगिरी (जटवाडा) येथे दिनांक ०९ फेब्रुवारी २०२४ शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता मुलनायक श्रीसंकटहर पार्श्वनाथ भगवंताचा पंचामृत अभिषेक करण्यात येणार आहे.
सर्व उपस्थित समाज बांधवांना ११ ते २ दरम्यान रमणलाल शिखरचंद नंदलाल, विजयकुमार महावीर, मनोज कासलीवाल परिवार अंबेलोहळ वाला कुवारफल्ली राजाबजार यांच्या वतीने महाप्रसाद दिला जाणार आहे.
९ फेब्रुवारी २०२४ शुक्रवार रोजी अमावस्या निमीत्त्त सकाळी १० वाजता मुलनायक भगवंताचा पंचामृत अभिषेक नित्यनियम पुजा होवुन सायंकाळी भगवंताची आरतीही करण्यात येणार आहे तरी समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन अभिषेक व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष विनीत लोहाडे व महामंत्री प्रमोद पांडे यांनी केले आहे.
श्रीक्षेत्र जैनगिरी येथे महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला भगवंताचा पंचामृत अभिषेक करण्यात येत असतो तसेच यावेळी भाविकांकडुन महाप्रसादाचेही आयोजन केले जाते, अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.