Marmik
Chhatrapati Sambhaji Nagar

…अन्यथा पाळीव प्राण्यांवर जप्तीची कारवाई; मालकांनाही भरावा लागणार दंड! छत्रपती संभाजीनगर महापालिकेने काढले आदेश

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

छत्रपती संभाजीनगर – महानगरपालिका हद्दीत मोकाट जनावरांना चाप लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने आदेश काढले असून आपल्या पाळीव प्राण्यांचा परवाना तसेच नूतनीकरण परवाना काढून घ्यावा अन्यथा जप्तीची कारवाई आणि मालकांना दंड थोटावण्यात येईल, असे आदेश छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पशुवैद्यकीय अधिकारी यांनी काढले आहेत. या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका हद्दीत नागरिकांकडे असलेले पाळीव प्राणी जनावरे उदाहरणार्थ उंट, घोडा, गाढव, गाय, बैल, म्हैस, रेडा, वराह, शेळी, मेंढी, श्वान व मांजर या प्राण्यांचा सण 2023 – 24 पासून परवाना घेतलेला नाही. म्हणजेच आपल्याकडील पाळीव प्राणी जनावरे हे अनधिकृत आहेत, असे समजते.

यापूर्वी महानगरपालिका कार्यालयाने वेळोवेळी स्थानिक प्रसार माध्यमातून याबाबत कळविले असतानाही नागरिकांनी पाळीव प्राणी जनावरे यांचा परवाना घेतलेला नाही.

त्यामुळे नागरिकांनी त्यांच्याकडील पाळीव प्राणी जनावरांचा परवाना, परवान्याचे नूतनीकरण ही नोटीस मिळाल्यापासून 10 दिवसाच्या आत पशुवैद्यकीय अधिकारी पशुचिकित्सालय बाजीपुरा महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर येथे कार्यालयीन वेळेत योग्य तो शुल्क भरून नवीन परवाना नूतनीकरण करून परवाना हस्तगत करावा.

अन्यथा आपल्याकडे असलेले पाळीव प्राणी जनावरे हे अनधिकृत आहेत, असे गृहीत धरून संबंधित नागरिकांविरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 127 (2) (क) च्या नियमानुसार तसेच आपले पाळीव प्राणी जनावरे जप्त करण्यात येतील व दंडही आकारण्यात येईल.

त्याचप्रमाणे भादवि कलम 188 नुसार संबंधित पोलीस ठाणे येथे संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Related posts

गणेशोत्सव: गणेश मूर्ती विक्रीतून लखोपती होण्याची महिलांची ‘उमेद’, पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन

Gajanan Jogdand

दिवाळखोरीत निघालेल्या बँकांच्या ठेवीदारांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा

Gajanan Jogdand

महावीर इंटरनॅशनल संस्थेने घेतले कर्मवीर नामदेवराव पवार शाळेला दत्त्तक

Gajanan Jogdand

Leave a Comment