मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
मुंबई – मनिपुर राज्यात मागील तीन महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे. सदरील हिंसाचार हाताळण्यात केंद्राला यश आलेले नाही मणिपूर मध्ये 19 जुलै रोजी मानवतेला काळीमा फासणारी अशी घटना घडली आहे. या घटना वेळीच न थांबल्यास ईशान्य भारत देशापासून कायमचा तुटेल, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
मणिपूर मागच्या तीन महिन्यापासून मोठ्या प्रमाणात धुमसत आहे. मणिपूर येथील प्रश्न हाताळण्यात आणि आणि येथे शांतता व सुव्यवस्था राखण्यात या दोन्ही सरकारांना अपयश आले आहे.
परिणामी येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडत आहे. यामध्ये प्रामुख्याने आदिवासी महिला बळी ठरत आहेत.
19 जुलै रोजी जमावाने दोन महिलांवर रात्रभर अत्याचार यात या दोन्ही महिलांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतरही जमावाने अत्याचार करणे थांबवले नाही.
मणिपूर मधील ही घटना मानवतेला काळीमा फासणारी अशी आहे. मणिपूर येथील हिंसाचारावर आणि घटनांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून आपले मत व्यक्त केले आहे.
त्यांनी ‘कालपासून मणिपूर मधली समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत, आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत.
मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान यांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती की आता तरी ह्या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल हे पहा, पण परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. आणि हेच दुर्दैव आहे. ह्या प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. पण त्याचवेळेस जर केंद्रसरकारकडून ठोस कृती होणार नसेल तर, आता राष्ट्रपती ह्यांनी ह्यात लक्ष घालायला हवं.
मणिपूरमध्ये गेल्या ३ महिन्यात जे घडलं त्याने फक्त मणिपूरच नाही तर संपूर्ण भारताच्या समाजमनावर ओरखडा उमटला आहे आणि ह्यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल. पंतप्रधानांनी आत्ता जरी ह्या घटनेचा निषेध केला असला तरी तो पुरेसा नाही, आता कृती करा, अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल’, असे म्हटले आहे.