Marmik
Hingoli live

जिल्ह्यातील साठवण तलाव ओव्हरफ्लो

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पाच्या साठवण तलावाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जवळपास सर्वच साठवण तलाव शंभर टक्के भरले आहेत. तर जिल्ह्यात असलेल्या येलदरी, सिद्धेश्वर आणि इसापूर धरणाच्या पाणीसाठ्यात ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही धरणे ही 75 ते 80 टक्के याच्यावर भरल्याने धरणातून पाणी साठा सोडला जात आहे.

हिंगोली जिल्ह्यात जुलै महिन्यापासून पडत असलेल्या पावसाने हिंगोली जिल्हा ओल्या दुष्काळाकडे मार्गक्रमण करत आहे. मेअखेर जिल्ह्यातील अंदाजे पंधरा साठवण तलाव जोत्याखाली गेलेली होती तर उर्वरित साठवण तलावांमध्ये ही जेमतेम पाणी साठा होता; मात्र जुलै महिन्यापासून जोरदार मोसमी पाऊस पडत असून ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांत पर्यंतच जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पा चहा पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन बहुतांश जलसाठे शंभर टक्के भरले आहेत.

यामध्ये हिंगोली तालुक्यातील पारोळा साठवण तलाव शंभर टक्के भरला असून वडद, चोरजवळा हे शंभर टक्के भरले असून हिरडी साठवण तलाव 85 टक्के भरला आहे. तर पेडगाव नवलगव्हाण हादगाव हे साठवन तलाव तसेच सेनगाव तालुक्यातील सवना, पिंपरी, बाभूळगाव, घोरदरी हे साठवन तलाव शंभर टक्के भरले आहेत.

तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील वाळकी, सुरेगाव, औंढा, सेंदुरसणा, पुरजळ, वंजारवाडी पिंपळदरी काकडधाबा केळी हे साठवन तलाव शंभर टक्के भरले आहेत. कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी, बोथी, दांडेगाव, देवधरी, राजवाडी हे साठवन तलाव शंभर टक्के भरले आहेत.

हिंगोली तालुक्यात असलेला खेर्डा कोल्हापुरी बंधारा 93% भरला असून ऑगस्ट महिन्यातच जिल्ह्यातील जवळपास सर्वच साठवण तलाव तुडुंब भरले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास या साठवण तलावाच्या वरून पाणी वाहण्याची शक्यता आहे.

Related posts

भास्करराव बेंगाळ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव! महाविद्यालयात वाढदिवस साजरा

Gajanan Jogdand

पहिल्या पेपरला 96.64% उपस्थिती; 486 विद्यार्थी गैरहजर

Santosh Awchar

कावड यात्रेचे कळमनुरी येथून हिंगोली कडे प्रस्थान; लाखोंचा जनसमुदाय उपस्थित

Santosh Awchar

Leave a Comment