मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर –श्री 1008 चिंतामनी पार्श्वनाथ दिंगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर संचलित उत्तमचंद ठोळे जैन छात्रालया चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय पी यु जैन (ठोळे) यांची ८१ वी जन्म जयंती छात्रालयात संपन्न करण्यात आली.
कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थानी तीर्थसंरक्षिणी महासभेचे महामंत्री महावीर ठोळे तर प्रमुख पाहुणे म्हणून पी यु जैन विद्यालय चे अध्यक्ष महावीर सेठी होते. प्रारंभी पाहुण्या च्या हस्ते दीप प्रज्वलन करून चिंतामणी पार्श्वनाथ भगवंताच्या फोटोस व स्वर्गीय पी यु जैन यांच्या अर्धाकृती पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.
तद्नंतर संस्थेचे अध्यक्ष संदीप ठोळे यांनी प्रास्ताविक केले ,छात्रालयाचे छात्र पियुष कंगले, आयुष दोडल, प्रमुख पाहुणे महावीर सेठी, अध्यक्ष महावीर ठोळे यानी पी यु जैन याच्या कार्यावर प्रकाश टाकुन विनयान्जली अर्पण केली.
ह्या प्रसंगी स्व. माणीकचंद सेठी यांच्या स्मृतित वाटर कुलर चे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे विश्वस्त एडवोकेट प्रमोद पाटणी यांनी केले याप्रसंगी,छात्रालयाचे छात्र,कार्यकारणी सदस्य दिगंबर क्षीरसागर, गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी संस्थेचे रेक्टर काळे व देशमाने यांनी विशेष परिश्रम घेतले.