Marmik
Hingoli live

पालकांनो सावधान! नारायणा ग्रुप ऑफ स्कूलला मान्यता नाही

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील नारायणा ग्रुप ऑफ स्कूल हिंगोली या शाळेत शासनाची कोणतीही मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे पालकांनी सावध होऊन आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घेत संबंधित शाळेत व मान्यता नसलेल्या अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन हिंगोली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

केंद्रीय व राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त शाळांकडून शैक्षणिक वर्ष 2024 – 25 साठीचे प्रवेश अर्ज प्रक्रिया राबविली जात आहे. अनेक शाळांनी वर्तमानपत्रात जाहिराती देऊन आपली शाळा कशी सुसज्ज आहे, शैक्षणिक वातावरण कसे आहे, इत्यादी दाखवले जाते; मात्र अनेक शाळांना शासनाची कोणतीही मान्यता मिळालेली नसते. तेव्हा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश घेताना संबंधित शाळेची मान्यता तपासूनच प्रवेश घेणे गरजेचे झाले आहे.

खाजगी शाळेस शासनाकडून मान्यता प्राप्त होतात. परंतु नारायणा ग्रुप ऑफ स्कूल हिंगोली या शाळेस शासनाकडून कोणतीही मान्यता मिळालेली नाही. या शाळेच्या व्यवस्थापनाने पालकांची दिशाभूल करुन विद्यार्थ्यांचे इयत्ता पहिली ते सातवीची प्रवेश प्रक्रिया सुरु केल्याचे दिसून येत आहे. तसेच वर्तमान पत्रात देखील शाळेची जाहिरात पालकांपर्यंत पोहोचविण्यात आलेली आहे.

नारायणा ग्रुप ऑफ स्कूल हिंगोली या शाळेस कोणतीही मान्यता नाही म्हणून सर्व पालकांनी मान्यता नसलेल्या अनाधिकृत शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊ नयेत. तसेच प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास स्वत: पालक जबाबदार राहतील, असे आवाहन गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, हिंगोली यांनी केले आहे.

Related posts

पाण्याच्या टाकीसाठी बनविण्यात आलेल्या खड्ड्यात पडून 6 वर्षीय बालिकेचा मृत्यू! वटकळी येथील घटना

Gajanan Jogdand

कळमनुरीतील आठवडी बाजार गल्ली व जटाळवाडी येथील हातभट्टी दारू निर्मिती उध्वस्त! कळमनुरी पोलिसांची कार्यवाही

Santosh Awchar

सेनगाव तहसील कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जन आक्रोश मोर्चा

Gajanan Jogdand

Leave a Comment