मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड येथे विभागीय स्तरीय शालेय ताइक्वांदो क्रीडा स्पर्धा 2022-23पार पडल्या. या स्पधे मधे 17 वर्षा खाली मुले 68-73 या वजन गटात पार्थ जितेंद्र बियानी यानी गोल्ड मेडल प्राप्त करूंन जोरदार कामगिरी केली. त्यामुळे त्याची जळगांव येथे होणाऱ्या राज्य स्तरीय शालेय ताइक्वांदो क्रीडा स्पर्धे साठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी पार्थ बियाणी त्याचे क्रिडा प्रशिक्षक ऑल हिंगोली जिल्हा स्पोर्ट तायक्वांदो असोसिएशनचे जिल्हा सचिव नवनाथ बांगर यांच्यासह 15 फेब्रुवारी रोजी जळगाव कडे रवाना झाला आहे.
16 ते 17 फेब्रुवारी या दरम्यान जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलावर राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो क्रिडा स्पर्धा पार पडणार आहेत.
या स्पर्धेसाठी जाण्याआधी खेळाडू पार्थ जितेंद्र बियाणी याचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या वतीने पार्थ जितेंद्र बियानी या खेळाडुचा आत्मविश्वास वाढावा म्हणुन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, वसमत तालुका क्रिडा अधिकारी संजय बेतिवार व हिंगोली तालुका क्रीड़ा अधिकारी नानक शिग बस्सी, विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष गजेंद्र बियानी व विद्यानिकेतन प्रिंसिपल नम्रता बेले व विद्यानिकेतनचे क्रीडा शिक्षक शोहेब, कराटे मधे वरिष्ठ असनारे प्रमोद वाघमारे, ऑल हिंगोली जिल्हा स्पोर्ट ताइक्वांदो असोसिएशन चे जिल्हा सचिव व विद्यानिकेतन चे क्रीडा शिक्षक नवनाथ बांगर, कळमनुरी मतदार संघाचे लोकप्रिय आमदार व जिल्हाप्रमुख संतोष दादा बांगर, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, व डॉ. (एम.बी. बी. एस., एम. डि.) संजय नाकाडे, हिंगोली जिल्ह्याचे मुख्य प्रशिक्षक ,वसमत तालुका सचिव,व चाणक्य प्रकाश अड़कीने या सर्व अधिकाऱ्यांनी पार्थ जितेंद्र बियानी या खेळाडुचे व त्याच्या प्रशिक्षका चे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
तसेच ऑल हिंगोली जिल्हा स्पोर्ट ताइक्वांदो असोसिएशन चे शिक्षिका मोनिका दराडे, प्रशिक्षक अविनाश बांगर, बालाजी खंडारे, एन आय एस कोच गजानन आडे, ट्रेनर साई रंणबावळे यांनीही पार्थ बियाणी यास शुभेच्छा दिल्या.
जळगाव येथे पार पडणाऱ्या या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी पार्थ बियाणी या खेळाडू सोबत ऑल हिंगोली जिल्हा स्पोर्ट असोसिएशनचे जिल्हा सचिव तथा विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक नवनाथ बांगर हेही जळगाव कडे रवाना झाले आहेत.