हिंगोली : संतोष अवचार
येथील बाजारपेठेत तूर व भुईमुगाला चांगला भाव आला असून या दोन्हींना ही सहा हजार रुपयांच्या वर दर मिळाल्याने शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे.
हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार पेठेत 1 जुलै रोजी सोयाबीनला पाच हजार 800 रुपयांपासून 6115 तर चांगल्या सोयाबीनला सहा हजार 431 रुपयांचा भाव मिळाला. हळदीला सहा हजार पाच रुपयांपासून सहा हजार 552 रुपये तर चांगल्या हळदीला सात हजार शंभर रुपयांचा भाव मिळाला. तुरीला 6185 रुपयापासून 6382 रुपये तर चांगल्या तुरीला सहा हजार 580 रुपयांचा दर मिळाला. गव्हाला 1800 रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये तर चांगल्या गव्हाला दोन हजार 800 रुपये असा दर मिळाला. तसेच ज्वारीला 1099 रुपयांपासून 1492 तर चांगल्या ज्वारीला 1186 रुपयांचा दर मिळाला.
हरभऱ्याला 4105 रुपयांपासून 4322 तर चांगल्या हरभऱ्याला चार हजार पाचशे चाळीस रुपये असा दर मिळाला. भुईमुगाला 5600 रुपयांपासून पाच हजार 927 चांगल्या भुईमुगाच्या शेंगाना 6 हजार 255 रुपये असा दर मिळाला. बाजारपेठेत भुईमूग व तुरीला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे.