Marmik
Hingoli live

प्रत्येक तालुक्यात एक हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लावा – जिल्हाधिकारी

हिंगोली : संतोष अवचार

हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक हजार हेक्टर याप्रमाणे एकूण पाच हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील प्रत्येक गावात वानिकी आधारित शेती पध्दतीअंतर्गत बांबूची वृक्ष लागवड करण्यासाठी रोहयो विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी कमलाकर फड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, रोहयाचे विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, नानाजी देशमुख कृषि संजीवनी (पोखरा) योजनेमध्ये जिल्ह्यातील 236 गावे समाविष्ट आहेत. या सर्व गावामध्ये पोखरा योजनेतून सार्वजनिक जमिनीवर बांबूची लागवड करण्यासाठी तहसीलदारांनी शासकीय जमिनीचा तपशील उपलब्ध करुन द्यावा. कृषि विभागाने योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अंदाजपत्रक तयार करुन बांबू लागवड करावी. तसेच वैयक्तीक लाभार्थ्यांच्या शेतावरही बांबू लागवड करावी. यासाठी पोखरा अंतर्गत 264 लाभार्थ्यांनी 127 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीसाठी अर्ज केला आहे. या क्षेत्रावरही बांबू लागवड करावी.

जिल्ह्यातील कृषि विभागाच्या 26 समूह सहायकामार्फत प्रत्येकी 10 हेक्टरच्या हद्दीत शासकीय पडिक जमीन, गायरान, गावठाण क्षेत्रावर, तसेच नाला काठ, सलग समतल चर व खोल समपातळी चरांच्या बांधावर बांबू वृक्षाची लागवड करावी. तसेच 227 वैयक्तीक लाभार्थ्यांनी 195 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीसाठी अर्ज केला आहे. त्यांच्याही शेतावर फळबाग लागवड करण्याच्या सूचना दिल्या.  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (एमआरईजीएस) योजनेतून पोखरा योजनेव्यतिरिक्त इतर गावात गटविकास अधिकारी यांनी शासकीय पडिक जमीन, गायरान, गावठाण क्षेत्रावर, तसेच नाला काठ, सलग समतल चर व खोल समपातळी चरांच्या बांधावर प्रत्येक तालुक्यात एक हजार हेक्टरवर बांबूची वृक्ष लागवड करावी. यासाठीचे  प्रस्ताव 5 जुलैपर्यंत सादर करावेत, अशा सूचना दिल्या.

Related posts

वादग्रस्त व्हाट्सअप स्टेटस ठेवणाऱ्या एकास कळमनुरी पोलिसांनी उचलले! हिंदू – मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचे उद्देशाने ठेवले होते स्टेटस

Santosh Awchar

सराईत गुन्हेगार कारागृहातच स्थानबद्ध! एमपीडीए कायद्याअंतर्गत केली सलग पाचवी कार्यवाही

Santosh Awchar

हिंगोली, कळमनुरी व बाराशिव यात्रेत सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या दहा व्यक्तींवर दामिनी पथकाकडून कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment