मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त जिल्हा होमगार्ड कार्यालयाच्या परिसरात जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे केंद्र नायक नानासाहेब मोखडे, जिल्हा कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी रमेश वडगावकर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर प्रशिक्षणाची होमगार्ड व हिंगोली पथकातिल होमगार्ड यांची प्रभात फेरी काढण्यात आली.
प्रभात फेरीला जिल्हा समादेशक यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.तत्पूर्वी जिल्हा समादेशक व उपविभागीय पोलिस अधिकारी ग्रामीण यांच्या हस्ते पुरुष होमगार्डच्या उजळणी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा समादेशक यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर कांदे, पलटन नायक यांनी केले तर केंद्र नायक नानासाहेब मोखडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिंगोली पथकाचे समादेशक अधिकारी सुदर्शन हलवाई, ज्येष्ठ कंपनी कमांडर संजय वसिया, राजकुमार बांगर, वरिष्ठ फलटण नायक विठ्ठल राऊत, फलटण नायक अनिल इंगोले, शंकर कंठे, वामन मगर, भागवत देवरसे, दृपदा जयस्वाल आदींनी परिश्रम घेतले.