सेनगाव : पांडुरंग कोटकर
तालुक्यातील हनकदरी नियतक्षेत्रात मौजे आडोळ येथे सेनगाव वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी 250 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
9 जुलै रोजी सेनगाव येथील येथील वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत सेनगाव वन परिमंडळ मधील हनकदरी नियतक्षेत्रातील मौजे आडोळी येथील वन क फॉरेस्ट सर्वे नंबर 52 मध्ये आडोळ ग्रामपंचायतीचे सरपंच परमेश्वर पोले, नारायण दनर पोलीस पाटील, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ आडोळ चे अध्यक्ष राहुल खिल्लारे, सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक चाटसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी 250 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच आडोळ येथील सर्वे नंबर 52 मधील अतिक्रमण काढून घेण्यात आले होते. या परिक्षेत्रात आता वृक्षारोपण करून हा परिसर हरित केला जाणार आहे.