मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – तालुक्यातील दिग्रस कराळे येथे 29 जुलै रोजी वन घन योजनेअंतर्गत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दिग्रस कराळे येथे या योजनेअंतर्गत गायरान जमिनीवर 21 हजार झाडे लावून ती जगविली जाणार आहेत.
यावेळी विभागीय वनाधिकारी केशवराव वाबळे सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्राधिकारी विश्वात यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी एस. बी. कीर्तनकार, वनपाल सय्यद, वनरक्षक व्ही. टी. शिंदे, ग्रामपंचायत सदस्य बळीराम पाटील, संभाजी कऱ्हाळे, रमेश कऱ्हाळे, रावसाहेब कऱ्हाळे, एडवोकेट पंजाब कऱ्हाळे, कवी शिवाजी कऱ्हाळे, अनिल हलगे, बाबुराव कुऱ्हे, संतोष कोरडे, वृक्षारोपण करते वेळेस आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कवी शिवाजी कऱ्हाळे, वनपाल सय्यद यांनी वृक्षरोपण करणे आणि वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे उपस्थितांना सांगितले.
डिग्रस येथील गायरान जमिनीमध्ये जवळपास 21 हजार वृक्ष लावले जाणार आहेत.