Marmik
Love हिंगोली लाइफ स्टाइल

हिंगोली येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या वतीने आज 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

पर्यावरणाचा होणारा रास, बदलते ऋतुमान व वाढलेल्या तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त विविध कार्यालयाच्या वतीने तसेच सामाजिक व्यक्ती, संस्था यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून ती वर्षभर जगवून त्यास मोठे करण्याचा प्रयत्न केला जातो.

या दिनानिमित्त हिंगोली विभागीय वन अधिकारी कार्यालय परिसरात वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक वन दिन साजरा करण्यात आला.

तसेच ‘मेरी लाईफ’ कार्यक्रमांतर्गत विभागीय वन अधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता करून पर्यावरण अनुकूल जीवन जगण्याची शपथ घेण्यात आली.

यावेळी हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांच्यासह वन परिमंडळ अधिकारी कळमनुरी, हिंगोली व सर्व वनरक्षक उपस्थित होते.

Related posts

कौमी एकता क्रिकेट स्पर्धेत पोलीस अधीक्षक कार्यालयाने पटकावले विजेतेपद तर बासंबा पोलीस ठाणे संघ ठरला उपविजेता, जल्लोषपूर्ण वातावरणात बक्षीस वितरण

Santosh Awchar

हिंगोली दसरा महोत्सवानिमित्त वाहतुकीत बदल

Santosh Awchar

हिंगोली जिल्ह्यात 266 गावात एक गाव एक गणपतीची स्थापना

Santosh Awchar

Leave a Comment