मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील कवी शिवाजी कराळे यांना नांदेड पार पडलेल्या साहित्य संमेलनात संत नामदेव साहित्य पुरस्काराने मान्यवरांच्या सन्मानित करण्यात आले. त्यांचे जिल्हाभरात कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील कवी शिवाजी कऱ्हाळे यांनी सामाजिक साहित्यिकक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी मुळे कवी त्यांना नानक साई फाउंडेशन व महाराष्ट्र शासन साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई यांनी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनामध्ये कवी शिवाजी कराळे यांना संत नामदेव साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जगदीश कदम, प्राध्यापक फ. मु शिंदे, साहित्य व
सांस्कृतिक मंडळ मुंबई सदस्य विजय सिंदगीकर, कोलते, साहित्य संमेलनाचे व पुरस्कार वितरण सोहळ्याचे संयोजक पंढरीनाथ बोकारे, प्राध्यापक देवकर, डॉक्टर संजय जगताप यांच्यासह पंजाब व महाराष्ट्र मधुन आलेले अनेक नामवंत साहित्यिक कार्यक्रमास उपस्थित होते.