Marmik
Hingoli live

वाघजाळी येथे शांततेत पार पडला पोळा सण

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / परमानंद तांबिले :-

वाघजाळी – सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे 26 ऑगस्ट शुक्रवार रोजी मोठ्या शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात शेतकऱ्यांचा बैलपोळा हा सण साजरा करण्यात आला.

सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील अतिसंवेदनशील समजल्या जाणारा पोळा गेल्या पंधरा वर्षापासून अगदी शांततेत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. यावेळी गावातील नवतरुण मंडळींनी विशेष पुढाकार घेऊन पोळा शांततेत निर्वीघ्न पार पाडण्यासाठी मोलाचं सहकार्य केले.

यावेळी गावचे सरपंच विवेकानंद तांबिले गावचे चेअरमन शुभम तांबिले (मानदार) यांनी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी ढोल ताशाच्या गजरात गावातील मानदार हरिभाऊ तांबिले, विष्णू गांधिले यांच्या घरून बैलासाठी निवेद घेऊन पूर्ण बैलांना निवेद साधण्यात आला.

गावातील वाड्याला ढोल ताशाच्या गजरात बैलाला नियोजनबद्ध पद्धतीने प्रदक्षिणा घालण्यात आली व घरोघरी बैलांना शांततेत पार करण्यात आला. यावेळी गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती किसनराव तांबिले, दाजीबा पाटील, विश्वनाथ तांबिले, लक्ष्मण गांधीले, नारायण सरपंच विष्णू भोपे, पठाण सरफराज, किशन भोपे, तंटामुक्ती अध्यक्ष रामेश्वर हांडे, शंकर घोगरे, अरुण तांबिले, शंकर दुकानदार, विष्णू तांबिले व इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

कुरुंदा येथे हळदी – कुंकाचा कार्यक्रम

Gajanan Jogdand

शरदचंद्रजी पवार वरिष्ठ महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत पडल्या पार

Gajanan Jogdand

53 अजामीनपात्र व पोटगी वॉरंट मधील इसमांना पकडून न्यायालयात केले हजर

Santosh Awchar

Leave a Comment