Marmik
क्राईम

पोलिसांचे जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन; संशयास्पद फिरणाऱ्या 11 व्यक्तीविरुद्ध कारवाई

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत एकाच वेळेस संपूर्ण जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. यामध्ये अनेक व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. तसेच संशयास्पद फिरणाऱ्या 11 व्यक्तींविरुद्ध कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व लपून छपून चालणारे अवैध धंद्याबाबत कठोर भूमिका घेत तसेच यापूर्वी गंभीर गुन्ह्यातील व चोरी जबरी चोरी घरफोडी तसेच दरोडा या गुन्ह्यातील आरोपींना नियमित तपासणी व त्यांच्याविरुद्ध कठोर प्रतिबंध कार्यवाही सुरू केली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून गुन्हेगारांची तपासणी अवैध धंद्याविरुद्ध कारवाई ठराव पाहिजे, तसेच न्यायालयाच्या वॉरंटमधील आरोपींचा शोध अशा व्यापक हेतूने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात 4 ऑक्टोबरच्या रात्री 11 वाजेपासून 5 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

या मोहिमेत अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिपान शेळके, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे, पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे, पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम,

सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी, सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, सहायक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार,

तसेच स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने व सर्वच पोलीस ठाण्यामधील दुय्यम पोलीस अधिकारी व मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.

या मोहिमेत जिल्ह्यातील एकूण 17 ठिकाणी जेथे रेकॉर्डवरील वसराईत गुन्हेगार आहेत, अशा ठिकाणी पोलीस पथकाकडून गुन्हेगार तपासणी करण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील मोक्का मधील फरार व तडीपार आदेश झालेले तसेच फरार व पाहिजे असलेले आरोपींचीही तपासणी करण्यात आली.

जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येऊन वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान हिंगोली शहर पोलीस ठाणे येथे एक व हट्टा पोलीस ठाणे येथे एक संशयित वाहन डिटेन करण्यात आले.

या मोहिमेत हिंगोली शहर पोलीस ठाणे, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे, वसमत शहर पोलीस ठाणे येथे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4 / 25 अन्वये 4 गुन्हे दाखल करण्यात आले.

मोहिमे दरम्यान न्यायालयाकडून वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर न्यायालयात हजर राहत नव्हते व ज्यांच्या बाबत न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाले होते, अशा एकूण 12 अटक वॉरंटमधील व्यक्तींना पकडून ताब्यात घेण्यात आले.

हद्दपारचे आदेश असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात मिळून आलेल्या दोन व्यक्तीवर हिंगोली शहर पोलीस ठाणे व हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे येथे कलम 142 मपोका अन्वये 3, 109 सीआरपीसी अन्वये 2, 110 / 117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कार्यवाही करण्यात आली.

अंधाराचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या मिळून आलेल्या व्यक्तीविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाणे, कळमनुरी, हिंगोली ग्रामीण, औंढा नागनाथ, सेनगाव, वसमत शहर, हट्टा, कुरुंदा पोलीस ठाणे येथे एकूण 11 व्यक्तींविरुद्ध कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Related posts

हिंगोली येथे 10 टवाळखोरांवर दामिनी पथकाची कारवाई

Gajanan Jogdand

ईसापुर रमना येथील महिलेचे खून प्रकरण; आरोपी पतिवर गुन्हा दाखल

Santosh Awchar

शेतकऱ्यांचे पशुधन चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद, तीन आरोपींसह 5 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

Leave a Comment