Marmik
Hingoli live

हिंगोली येथे पोलीस स्मृतिदिन कार्यक्रम

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील पोलीस मुख्यालय येथे 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतिदिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या उपस्थितीत पोलीस गार्डन हवेत फैरी झाडून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या व देशासाठी बलिदान करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.

लडाखमधील हॉटस्प्रिंग येथे 21 ऑक्टोबर 1959 रोजी एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने भारत – चीन सीमेवर पहारा देणाऱ्या एका तुकडीवर चिनी सेनेच्या सैनिकांनी अचानक हल्ला चढविला. सदर हल्ल्यात जवानांनी अत्यंत शौर्याने तोंड देऊन देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.

त्यांच्या स्मरणार्थ तसेच वर्षभरात ज्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संबंध भारतात दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळण्यात येतो.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत नामदेव पोलीस कवायत मैदान हिंगोली येथे पोलीस स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमास पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 चे पोलीस उपाधीक्षक आर. बी. दामणवाड, पोलीस निरीक्षक सय्यद अखिल, पोलीस निरीक्षक पंडित कचवे, पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, राखीव पोलीस निरीक्षक अलीम शेख,

सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, इतर पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते.

सर्व मान्यवरांनी सदर कार्यक्रमात शहीद स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली तर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली येथील पोलीस गार्डने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून श्रद्धांजली वाहिली.

तसेच गत वर्षभरात 1 नोव्हेंबर 2022 ते 31 ऑगस्ट 2023 यादरम्यान भारतात एकूण 189 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती दिली. या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांनी त्या सर्व शूरवीरांच्या नावाचे वाचन केले.

Related posts

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : 15 ऑगस्ट रोजी संस्कृतिक कार्यक्रम

Gajanan Jogdand

शिवजन्मोत्सव: राजेंची जयंती दाही दिशा गाजली; हिंगोली झाले भगवेमय, महिला लेझीम व फुगट्यनी शिवप्रेमींचे लक्ष वेधले, पायदळ घोड्यांनी आणली मिरवणुकीत रंगत, हजारोंचा जनसमुदाय उपस्थित

Gajanan Jogdand

‘जिथे कमी तिथे आम्ही’ उपक्रमांतर्गत 18 जूनला गुणगौरव सोहळा

Gajanan Jogdand

Leave a Comment