Marmik
Hingoli live क्राईम

पोलिसांच्या सतर्कतेने दरोड्याचा डाव उधळला! घातक हत्यारासह तीन जण ताब्यात!!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील पोलिसांच्या सतर्कतेने वसमत येथे दरोडेखोरांचा दरोड्याचा डाव उधळला आहे. या प्रकरणी तीन जणांना घातक हत्यारासह ताब्यात घेतले तर दोघेजण पळून गेले. या सर्वांवर वसमत शहर पोलीस ठाण्यात भादविच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रतिबंध घालण्यासाठी सतर्क रात्रगस्त ठेवली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून दोन जून रोजी वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत शहर पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक आर. आर. महीपाळे यांच्या नेतृत्वात पथक रात्रगस्त करीत असताना आसेगाव रोडवरील साईनगर कडे जाणाऱ्या रस्त्यालगद रिकाम्या प्लॉटमध्ये रेकॉर्डवरील पाच गुन्हेगार घातक शस्त्रासह दरोडा घालण्याचे पूर्व तयारीनिशी दबा धरून असताना वसमत शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने सदर दरोडेखोरांवर मध्यरात्री झडप मारून त्यांना ताब्यात घेतले.

तसेच त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ छऱ्याची एयर पिस्टल, सब्बल (पहार) सुरा, कत्ता, सुताची दोरी तसेच मिरची पूड असे साहित्य आढळून आले.

या दरोडेखोरांची नावे अक्षय पिराजी पवार, बाबा नागोराव गोरे, बालाजी उर्फ सिन्ना नागोराव गोरे तिघे (रा. कारखाना रोड वडरवाडा वसमत) व फरार आरोपी नामे शिवा यल्लाप्पा गुंडाळे (रा. कारखाना रोड वडरवाडा वसमत), तसेच शेख अहमद उर्फ कन्नी शेख नसीर (रा. वसमत) अशी त्यांची नावे आहेत.

सदर आरोपींपैकी बालाजी उर्फ सिन्ना नागोराव गोरे यास हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव प्रलंबित आहे. यातील नमूद आरोपींवर घरफोडी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

सदर आरोपी दरोड्याच्या तयारीत असताना घातक हत्यारासह मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक आर. आर. महिपाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भादवि कलम 399 कलम 4, 25 भाहका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ही कार्यवाही हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल महिपाळे, पोलीस अंमलदार शेख हकीम, सुरेश वाघमारे, संदीप जोंधळे, विवेक गुंडरे, राहुल राठोड, शेख अशफाक यांनी केली.

Related posts

दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाची प्रतिबंधीत सुगंधीत पान मसाला व तंबाखू वर कार्यवाही

Santosh Awchar

गुलामीची मुळे जातीत.. म्हणून स्त्रियांवर बंधने! – वैशाली डोळस, अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेचा समारोप; महिलांची तुडुंब गर्दी

Santosh Awchar

जिल्हास्तरीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॅाल कप क्रीडा स्पर्धेचे आयोजन

Santosh Awchar

Leave a Comment