मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील रेल्वे स्थानकावरून धावणारी पुर्णा ते अकोला पॅसेंजर रेल्वेगाडी सकाळच्या वेळी उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
पूर्णा ते अकोला पॅसेंजर रेल्वे गाडी क्र. ०७७७३ हीचा सकाळी ७ वाजता पुर्णा स्टेशन येथून निघण्याची वेळ आहे. ७.२० वाजता वसमत व हिंगोली ९.०० वाजेपर्यंत पोहचते. परंतु जवळपास दहा बारा दिवस झाले, ही रेल्वे दररोज सकाळी १०.३० च्या नंतरच पूर्णा स्टेशन येथून निघत आहे.
पॅसेंजर बंद करुन डेमो लोकल चालु केली. डेमो लोकल चालु केल्या पासुन पुर्णा ते अकोला पॅसेंजरला उशीर होत आहे.
पुर्णा ते वाशिम पर्यंत दररोज आपडावुन करणारे कर्मचारी, विद्यार्थी, तसेच शासकीय कामाकरिता हिंगोली येथे येणारे जवळ पास ४००-५०० प्रवाशी आहेत. परंतु ही रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
त्यामुळे पुर्णा-अकोला पॅसेंजर रेल्वेगाडी सकाळी ७ वाजता पूर्णा स्टेशनवरून सोडण्याची मागणी वसमत तालुक्यातील प्रवाशांकडुन होत आहे.