Marmik
Hingoli live

महावितरण कडून मान्सूनपूर्व कामांना सुरुवात; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील महावितरण कार्यालयाकडून मान्सूनपूर्वकामी केली जात आहेत; मात्र सदरील कामे करताना वातावरणातील बदलाने व सोसाट्याच्या वाऱ्याने कामात व्यत्यय येत असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन हिंगोली महावितरण कार्यालय कार्यकारी अभियंता रजनी देशमुख व उपमुख्य कार्यकारी अभियंता दिनकर पिसे यांनी केले आहे.

सध्या मे महिना सुरू असून या महिन्याच्या शेवटपासूनच हंगामी मोसमी पावसाला सुरुवात होत असते. मोसमी पावसात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून महावितरण कार्यालयाकडून दरवर्षी मान्सूनपूर्व कामे केली जातात.

महावितरण कार्यालयाकडून सध्या मान्सूनपूर्वकाने युद्धपातळीवर केली जात आहे; मात्र सध्या बदललेल्या वातावरण आणि अवकाळी पाऊस होत आहे. पावसासोबत वादळी वारे सुटत असून विजा कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. यामुळे विद्युत खांबांचे तसेच विद्युत तारांचे व विद्युत डीपी यांचे देखील मोठे नुकसान होत असून विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे.

खंडित झालेला विद्युत पुरवठा सकाळी सुरू केल्यानंतर पुन्हा सायंकाळी वादळी वारे सुटून तो विस्कळीत होत आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होत आहे.

विजांच्या कडकडाटाने व वीज अंगावर पडण्याच्या भीतीने वीज कर्मचाऱ्यांना पाठवणे चुकीचे ठरत आहे. तरीही महावितरणचे कर्मचारी तात्काळ नुकसान झालेल्या ठिकाणी भेट देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची कामे करत आहेत.

महावितरण कार्यालयाकडून जीर्ण झालेल्या तारा काढून नवीन तारा टाकने, वाकलेले विद्युत पोल सरळ करणे, जुने विद्युत पोल काढून त्या जागी नवीन विद्युत उभारणे, विद्युत डिप्यांची सुधारणा आदी कामे केली जात आहेत.

सदरील कामे करताना विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन हिंगोली येथील महावितरण कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अभियंता रजनी देशमुख व उपमुख्य कार्यकारी अभियंता दिनकर पिसे यांनी केले आहे.

Related posts

महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी पुन्हा पोलीस दीदी, पोलीस काका उपक्रम; 450 शाळा व महाविद्यालयात बसविल्या तक्रारपेटी!

Santosh Awchar

निजाम काळापासून चालत आलेला गुगुळपिंपरी येथील दसरा महोत्सव; उत्सवाने जोपासल्या अनेक कला! नवसाला पावणाऱ्या देवांची गावातून काढली जाते आगळीवेगळी मिरवणूक

Gajanan Jogdand

जिल्ह्यात सक्रीय क्षयरुग्ण व कुष्ठरोग रुग्ण शोध मोहिम सुरू ; अभियान यशस्वी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांचे निर्देश

Santosh Awchar

Leave a Comment