Marmik
Hingoli live

पत्रकार बाबुराव ढोकणे यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर, 27 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय पत्रकार संमेलनात केले जाणार सन्मानित

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल महाराष्ट्र या पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने हिंगोली येथील पत्रकार बाबुराव कामाजी ढोकणे यांना यंदाचा प्रेरणा पुरस्कार 2022 जाहीर झाला आहे. कोल्हापूर येथे आयोजित 17 व्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलनात मान्यवरांच्या हस्ते बाबुराव ढोकणे यांना सदरील पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल महाराष्ट्र या पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने 27 डिसेंबर 2022 रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलनात हिंगोली येथील पत्रकार बाबुराव कामाजी ढोकणे यांना संघटनेच्या वतीने जाहीर झालेला प्रेरणा पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आंतरराष्ट्रीय पत्रकार जेतीन देसाई हे उपस्थित राहणार असून संमेलना अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार सचिन परब हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माहिती व जनसंपर्क उपसंचालक डॉक्टर संभाजी खरात हे उपस्थित राहणार आहेत.

स्वागताध्यक्ष म्हणून जे एफ सी केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते आरते तसेच ब्लॉगर पत्रकार मच्छिंद्र येणापुरे हे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे स्वागत एजेएफसी विश्वस्त तथा जेष्ठ पत्रकार अतुल फोन कळसे हे करणार असून प्रस्तावना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल हे करणार आहेत.

पत्रकार बाबुराव ढोकणे यांना ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल महाराष्ट्र या पत्रकार मित्र संघटनेचा प्रेरणा पुरस्कार 2022 जाहीर झाल्याने त्यांचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, अध्यक्ष गणेश कोळी, सरचिटणीस बाळकृष्ण कासार यांच्यासह हिंगोली येथील पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Related posts

श्रावण सरी होणार शब्दबद्ध! हिंगोली येथे राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन

Santosh Awchar

कोंबिंग ऑपरेशन: अनेकांची धरपकड, जवळा बाजार येथील जुगार अड्ड्यावर छापा; 95 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

काजीपेठ-मुंबई रेल्वेच्या मागणीलाही महाप्रबंधांकडून रेड सिग्नल!

Santosh Awchar

Leave a Comment