Marmik
Hingoli live क्राईम

हिंगोली व औंढा नागनाथ येथे सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 11 व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – औंढा नागनाथ व हिंगोली येथे सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 11 टवाळखोरांवर दामिनी पथकाने कलम 110 / 117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही केली आहे.

हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस व जनता सुसंवाद वाढविण्यावर व विशेष करून शाळा, महाविद्यालय तसेच शिकवणी व वसतिगृह या ठिकाणी तसेच शहरातील बस स्थानक, रेल्वे स्थानक, मुख्य बाजारपेठ परिसर व धार्मिक स्थळे व इतर गर्दीच्या ठिकाणी मुली व महिला तसेच बालकांबाबत होणारे छेडछाडीच्या घटना यांना आळा घालण्यासाठी तसेच सदर परिसरात मुली, महिला व बालक यांना सुरक्षितता वाटावी म्हणून दामिनी पथकास विशेष सूचना देऊन कार्यरत केले आहे.

सदर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, पोलीस अंमलदार सरनाईक, महिला पोलिस अंमलदार आरती साळवे, अर्चना नखाते, शेख सलमा यांची नेमणूक केली आहे.

सदर दामिनी पथकाने 26 फेब्रुवारी ते 5 मार्च या दरम्यान हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनात हिंगोली शहरात व औंढा नागनाथ शहरात वरील महत्त्वाच्या एकूण 43 ठिकाणी भेटी दिल्या.

नमूद परिसरात सार्वजनिक शांतता भंग करणारे व टवाळखोर असे तब्बल 11 इसमावर कलम 110 / 117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय प्रभावी प्रतिबंध कार्यवाही केली आहे.

तसेच दामिनी पथकाने अडचणीच्या वेळी तत्काळ मदतीसाठी हेल्पलाइन नं. 8007000493 ची सेवा सुद्धा सुरू करून त्याचा प्रसार केला आहे

Related posts

हिंगोली जिल्ह्यातील धरणग्रस्त शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत..

Gajanan Jogdand

मणिपूर अत्याचार प्रकरण: नराधमांना तात्काळ अटक करा; मणिपूर येथे राष्ट्रपती राजवट लागू करा, आदिवासी युवक कल्याण संघ महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रपतींना निवेदन

Santosh Awchar

दामिनी पथकाकडून हेल्पलाइन नंबर सुरू, अडचणीतील महिला व मुलींना मिळणार तात्काळ मदत!

Gajanan Jogdand

Leave a Comment