Marmik
Hingoli live क्राईम

बस स्थानक, रामलीला मैदानासमोर विनाकारण फिरणाऱ्या 6 व्यक्तीविरुद्ध प्रतिबंधक कार्यवाही

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील बस स्थानक व रामलीला मैदान हिंगोली अकोला रोड समोरील परिसरात विनाकारण फिरणाऱ्या तसेच सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या सहा टवाळखोरांविरुद्ध पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाकडून कलम 110 / 117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आहे.

हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस व जनता सुसंवाद वाढविण्यावर तसेच विशेष करून शाळा, महाविद्यालय, शिकवणी व वसतिगृह या ठिकाणी त्याचप्रमाणे शहरातील बसस्थानक, रेल्वे स्थानक, बालउद्यान, मुख्य बाजारपेठ, परिसर, धार्मिक स्थळे व इतर गर्दीच्या ठिकाणी मुली, महिला तसेच बालकांबाबत होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांना आळा

घालण्यासाठी सदर परिसरात मुली, महिला व बालक यांना सुरक्षितता वाटावी म्हणून दामिनी पथकास विशेष सूचना देऊन कार्यरत केले आहे. तसेच विनाकारण आरडाओरड करणाऱ्या व्यक्तीवर आळा घालून प्रतिबंधक कार्यवाही केली जात आहे.

दामिनी पथकाने वेगवेगळ्या शिकवणी वर्गावर जाऊन भेटी देऊन मुलींशी संवाद साधला. त्यांच्या तोंडी तक्रारी ऐकून घेतल्या. त्यांना योग्य मार्गदर्शन केले. तसेच त्यांना कायदे विषयी माहिती दिली. गुड टच, बॅड टच बाबत सविस्तर माहिती सांगून संकटकालीन डायल 112 बाबत माहिती दिली.

सदर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, पोलीस हवालदार सरनाईक, महिला पोलीस अंमलदार आरती साळवे, अर्चना नखाते, पोलीस अंमलदार चंद्रशेखर देशमुख यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

सदर दामिनी पथकाने मागील आठवड्यात 13 ते 19 नोव्हेंबर या दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील शाळा व इतर 50 महत्त्वाच्या ठिकाणी भेटी दिल्या.

हिंगोली येथील बसस्थानक व रामलीला मैदान हिंगोली अकोला रोड समोरील परिसरात विनाकारण फिरणाऱ्या व सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 6 टवाळखोर व्यक्तींवर कलम 110 / 117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही केली व समज देऊन त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुखरूप दिले.

दामिनी पथकाने अडचणीच्या वेळी तात्काळ मदतीसाठी हेल्पलाइन 8007000493 तसेच डायल 112 ची सेवा सुद्धा सुरू करून त्याचा प्रसार केला आहे.

Related posts

अतिवृष्टीतून वगळण्यात आलेल्या मंडळातील गावांना सरसकट आर्थिक मदत द्या, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन

Gajanan Jogdand

पोलीस भरती आवेदन पत्र भरण्यास मुदतवाढ

Gajanan Jogdand

हर घर तिरंगा मोहिमे सोबतच प्रत्येकांनी covid चा बूस्टर डोस घ्यावा – जिल्हाधिकारी पापळकर

Santosh Awchar

Leave a Comment