Marmik
क्राईम

17 टवाळखोर व्यक्तींवर दामिनी पथकाकडून प्रतिबंधात्मक कारवाई

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – शहरातील विविध भागात विनाकारण फिरणाऱ्या व सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या अशा एकूण 17 टवाळखोर व्यक्तींविरुद्ध दामिनी पथकाकडून प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. सदरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली कलम 110 / 117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय करण्यात आली. तसेच एका अल्पवयीन मुलास त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात सुखरूप दिले.

हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस वजनता सुसंवाद वाढविण्यावर तसेच विशेष करून शाळा, महाविद्यालय शिकवणी व वसतिगृह या ठिकाणी त्याचप्रमाणे शहरातील बसस्थानक, रेल्वे स्थानक, बालउद्यान, मुख्य बाजारपेठ परिसर, धार्मिक स्थळे व इतर गर्दीच्या ठिकाणी मुली, महिला तसेच बालकांबाबत होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांना आळा

घालण्यासाठी तसेच सदर परिसरात मुली, महिला व बालकांना सुरक्षितता वाटावी म्हणून दामिनी पथकास विशेष सूचना देऊन कार्यरत केले आहे. तसेच विनाकारण आरडाओरड करणाऱ्या व्यक्तीवर आळा घालून प्रतिबंधक कार्यवाही केली जात आहे.

दामिनी पथकाने वेगवेगळ्या शिकवणी वर्गावर जाऊन तसेच वेगवेगळ्या शाळेवर जाऊन शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या तोंडी तक्रारी ऐकून घेतल्या, त्यांना योग्य मार्गदर्शन केले.

तसेच त्यांना कायदेविषयी माहिती देऊन ‘गुड टच’, ‘बॅड टच’ बाबत सविस्तर माहिती सांगून संकटकालीन डायल 112 बाबत माहिती दिली. तसेच बालविवाह बाबत सविस्तर माहिती व त्यांना कवायत बाबत माहिती दिली.

सदर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, पोलीस हवालदार चिलगर, महिला पोलीस अंमलदार आरती साळवे, अर्चना नखाते, पोलीस अंमलदार चंद्रशेखर देशमुख यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर दामिनी पथकाने मागील आठवड्यात 18 ते 24 डिसेंबर या दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील शाळा व इतर 55 महत्त्वाच्या ठिकाणी भेटी दिल्या.

हिंगोली येथील बस स्थानक, देवडा नगर येथील बालउद्यान, रामलीला मैदान, आदर्श महाविद्यालय व इतर ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या व सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या टवाळखोर अशा एकूण 17 व्यक्तींवर कलम 110 / 117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही केली. तसेच एका अल्पवयीन मुलास त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात सुखरूप दिले.

दामिनी पथकाने अडचणीच्या वेळी तात्काळ मदतीसाठी हेल्पलाइन 8007000493 तसेच डायल 112 ची सेवा सुद्धा सुरू करून त्याचा प्रसार केला आहे.

Related posts

ज्या शाळेत शिकले तिथेच केली चोरी! शेतकऱ्यांचे मोटार पंप व शाळेतील साहित्य चोरणारी टोळी जेरबंद; 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

आखाडा बाळापूर येथे कृषी पर्यवेक्षकाचा खून

Gajanan Jogdand

नांदेड येथून हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यात सराईतपणे गुन्हे करणाऱ्या तिसऱ्या आरोपीस दणका! एमपीडीए अंतर्गत आठवड्यातील तिसरी कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment