Marmik
Hingoli live

नियम मोडणाऱ्या वाहनांवर कार्यवाही सुरूच, सात दिवसात अकरा लाख 76 हजार 250 रुपयांचा दंड वसूल

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील शहर वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरूच आहे. मागील सात दिवसात हिंगोली शहर वाहतूक शाखेने 11 लाख 76 हजार 250 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

हिंगोली शहरात 9 ते 15 जानेवारी या दरम्यान वाहतूक नियम मोडणाऱ्या 1341 वाहनांवर कार्यवाही करून एकूण 9 लाख 37 हजार 250 रुपये दंड व अति वेगाने वाहन चालविणाऱ्या 124 वाहनांवर दोन लाख 39 हजार रुपये एवढा दंड तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 1465 वाहनांवर 11 लाख 76 हजार 250 रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे.

जिल्ह्यातील दुचाकी धारकांनी आपले वाहन शहरात फिरवताना देखील हेल्मेट चा वापर करावा अन्यथा मोटार वाहन कायदा कलम 129 / 194 (डी) प्रमाणे पाचशे रुपये दंडाची कारवाई करण्यात येईल.

त्याचप्रमाणे राष्ट्रीय राज्य महामार्गावर वाहन दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, अवजड वाहने चालविताना वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवू नये अन्यथा मोटार वाहन कायद्याप्रमाणे 2 हजार रुपये दंडाची कार्यवाही करण्यात येईल जवानांवर मोटार कायद्याचे उल्लंघन केल्याने दंड आकारण्यात आला आहे.

अशा वाहन चालकांनी दंड झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत रीतसर दंड भरून दंड भरण्याची पावती घ्यावी अन्यथा मुदत संपल्यानंतर त्यांची वाहने डिटेन करण्यात येतील असे आवाहन हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व हिंगोली शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

वरील कार्यवाही हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ए. आय. सय्यद व वाहतूक शाखेचे सर्व पोलीस अंमलदार यांनी केली.

रस्ता सुरक्षा सप्ताहात वाहनधारकांनी काळजी घ्यावी

11 ते 17 जानेवारी 2023 या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात असून या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व वाहन चालकांना मोटार वाहन कायद्याचे पालन करावे तसेच हिंगोली शहरात नो पार्किंग झोन मध्ये वाहन उभे करू नये, विरुद्ध दिशेने वाहन चालवू नय, जे वाहन चालक मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

Related posts

कावड यात्रेचे कळमनुरी येथून हिंगोली कडे प्रस्थान; लाखोंचा जनसमुदाय उपस्थित

Gajanan Jogdand

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकार कायद्याची होळी! अंमलबजावणी होत नसल्याने केला निषेध

Gajanan Jogdand

सणासुदीत प्रवाशांना दिलासा, खाजगी प्रवासी बस धारकांच्या मनमानीला बसणार चाप

Gajanan Jogdand

Leave a Comment