मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – यंदा सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिस विभागाकडे ऑनलाइन परवानगी घेऊनच श्रींची स्थापना करावी, असे आवाहन हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्याप्रमाणे हिंगोली जिल्ह्यात देखील दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. सदर उत्सव सार्वजनिक रीत्या साजरा करण्यासाठी पोलिस विभागाची परवानगीची आवश्यकता आहे. यापूर्वी सदर परवानगीही लेखी स्वरूपाचा अर्ज देऊन त्यावरून सार्वजनिक गणेश मंडळ हे परवानगी मिळवत असत. परंतु केंद्र शासनाच्या गवर्णन्स योजनेअंतर्गत क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम (cctns) प्रकल्प संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे.
या अनुषंगाने सन 2022 चे गणेशोत्सव साजरे करण्यास परवानगी मिळवण्याकरिता सार्वजनिक गणेश मंडळांनी संबंधित पोलीस ठाण्याकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. त्यामध्ये मंडळाचे सदस्य संबंधी माहिती गणेश मंडळ स्थापनेची जागा व विसर्जनाचा मार्ग तारीख व वेळ इत्यादी बाबतीत सविस्तर माहिती नमूद करावी. त्यावर संबंधित पोलिस ठाण्याकडून पडताळणी करून मंडळाला परवानगी देण्यात येईल. कोणीही लेखी स्वरुपात परवानगीसाठी अर्ज करू नयेत.
ऑनलाइन पद्धतीने परवानगी मिळण्यासाठी करावयाचा अर्जाचा नमुना https://citizen.mahapolice.gov.in या वेबसाईटवर असून सदर साईटचा वापर करून स्वतःचा युजर आयडी तयार करून अर्ज करता येईल. या प्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास काही अडचण आल्यास संबंधित पोलिस स्टेशनला देऊन माहिती मिळवावी.
तसेच जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी ऑनलाइन परवानगी घेऊनच श्रीगणेशाची स्थापना करावी असे आवाहन हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.