मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
हिंगोली – सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे इंस्टाग्रामवरील व्हिडिओ वरून मोठा राढा झाला आहे. मुस्लिम समाजातील जवळपास 21 लोकांनी मराठा समाजातील कुटुंबास दुकानात घुसून मारहाण केली आहे. सोडविण्यास गेलेल्या हिंदू समाजातील महिलांशी झटापट केली आहे. याप्रकरणी नरसी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाणीत बाप-लेक जखमी झाले आहेत. प्रकरणातील पीडित मराठा कुटुंबातील मुलास जास्त मार लागल्याने त्यास हिंगोली येथे उपचारासाठी आणण्यात आले आहे.
पुसेगाव येथील भास्कर (नाव बदलले आहे) (वय 44 वर्षे, जात मराठा व्यवसाय कापड दुकान) हे त्यांची पत्नी व मुलासह कापड दुकानात काम करत असताना 3 मे रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास 15 ते 20 मुस्लिम समाजातील मुले अचानक घुसून अंभोरे यांचा मुलगा आकाश (नाव बदलले आहे) यास ‘तुला लय माज आला का’ असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
तेव्हा प्रतीक हा जमावातील शेख इरफान यास म्हणाला की ‘माझा एडिट केलेला इंस्टाग्राम वरील व्हिडिओ तू काय डिलीट करत नाहीस’ असे म्हणला. त्यावर सदरील जमावाने एकदम पीडित सुभाष व त्यांचा मुलगा आकाश यास जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड, खंजीर, पंच व लाकडी दांडे तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
यात पीडित भास्कर यांच्या नाकावर व पाठीवर अंगावर जागोजागी जखमा झाल्या असून त्यांचा मुलगा प्रतीक यास गंभीर मार लागला आहे. भास्कर यांची पत्नी व आई यांनाही जमावाने रॉडणे मारले.
तसेच पीडित व्यक्तीची यांच्या पत्नीशी झटापट केली. त्यांच्या केसाला धरून ओढले. तसेच सर्वांना घराबाहेर ओढून मारहाण केली. सुभाष अंभोरे यांच्या नाकावर रॉड मारून जखमी केले.
पीडित कुटुंबास जीवे मारतो म्हणून धमकी दिली. तसेच धर्मावर शिवीगाळ केली. सदरील प्रकार सोडविण्यास आलेल्या अन्य एका महिलेशीही झटापट करून मारहाण केली.
अंभोरे कुटुंबास सोडविण्यास आलेले साक्षीदार रामदास शेषराव अंभोरे, गजानन गुलाब अंभोरे यांनाही सदरील जमावाने मारहाण केली. अंभोरे कुटुंबाची आरडाओरड ऐकून ते लोक सोबत आणलेले लाकडी दांडे, रॉड दुकानासमोर फेकून पळून गेले.
त्यानंतर नमूद साक्षीदार यांनी पीडित व्यक्ती व त्यांच्या कुटुंबास गाडीत बसून नरसी नामदेव पोलीस ठाणे येथे आणले. उपचारासाठी पत्रक देऊन त्यांना पाठविण्यात आले. सुभाष अंभोरे यांच्या मुलास जास्त मार लागल्यामुळे त्यास हिंगोली येथे पाठविण्यात आले आहे.
सदरील प्रकरणी नरसी नामदेव पोलीस ठाण्यात पीडित व्यक्तीच्या फिर्यादीवरून शेख इरफान शेख, मुस्तकीम अहमद खान राज, साहिल, सोफियान लाला, इरफान शेख, साबू भाई उर्फ सलमान पठाण, शाहरुख खान, इरफान पठाण (नरडेवाला), अयाज पठाण, इम्तियाज पठाण, अल्ताफ लाला, तांबोली (पानवाला), मोहसीन पठाण, अहमद पठाण, मुस्तफा पठाण, मुर्तुजा पठाण व त्यांची दोन मुले व इतर चार ते पाच अज्ञात व्यक्ती विरोधात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.