मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – गेल्या 31 वर्षापासून समाजसेवेचे कार्य अविरतपणे करणाऱ्या जायंट्स ग्रुप ऑफ चिकलठाणाची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली.
त्यात 2024 साठी नवीन कायकारिणी सर्वसाधारण मतदानाने जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये अध्यक्षपदासाठी राहुल मुथा, सहयोगी सचिवपदासाठी गणेश इंदाणी आणि कोषाध्यक्षपदी संगीता बांठिया यांची निवड करण्यात आली.
पवन सिपानी यांची अंतर्गत उपाध्यक्षपदी तर वैशाली कासलीवाल यांची बाह्य अध्यक्षपदी तसेच कल्पना मेहता यांची माजी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
संचालक सदस्यांमध्ये अनिल संचेती, रतन कुंकुलोल, दिनेश मुथा, भारती कटारिया, पूनम गिल्डा आणि रोहिणी मालशेटवार यांची निवड करण्यात आली. सल्लागार समितीमध्ये विनोद शेवतेकर, शिवप्रसाद तोतला, नरेश गुप्ता यांचा समावेश आहे.
निवड झालेल्या सर्व सदस्यांचे छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांकडून कौतुक व अभिनंदन केले जाता