मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क/ संतोष अवचार :-
हिंगोली – आखाडा बाळापूर येथील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील हॉटेल जगदंबाच्या बाजूस चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने 11 जुलै रोजी रात्री नऊ वाजता छापा मारला. यावेळी पोलिसांनी एक लाख 16 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर 9 जुगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील लपून छपून चालणारे अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याच्या सूचना दिले आहेत. त्या अनुषंगाने 11 जुलै रोजी पोलीस पथकाने बाळापूर येथील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील हॉटेल जगदंबा च्या बाजूस चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर रात्री नऊ वाजता छापा मारून रोख 30 हजार 70 रुपयांसह इतर एकूण एक लाख 16 हजार 70 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकूण नऊ आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेर सिंग उर्फ कालू सिंग भीम सिंग बावरी, शेख बाबू शेख मोहम्मद, संजय प्रकाश पालमवाड, प्रभाकर मारोतराव फोपसे, निखिल सुभाष बंडेवार, बालाजी रावजी बोंढारे, संजय बाबाराव पांढरे, शेख मुनीर शेख अमीर, ऋषिकेश बोंढारे या सर्व जुगारी विरुद्ध पोलीस स्टेशन बाळापुर येथे सहायक पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक माधव जीव्हारे , पोलीस आमलदार किशोर कातकडे, ज्ञानेश्वर पायघन, मोहसीन शेख, सुमित टाले, दळवे यांच्या पथकाने केली.
यापुढे सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील अवैधधंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.