मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार, पांडुरंग कोटकर, सतीश खिल्लारी :-
हिंगोली / सेनगाव – तालुक्यातील कापडसिंगी येथे लायसन क्लबच्या नावाखाली चालणाऱ्या जुगारावर हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 20 जून रोजी छापा मारला. यावेळी नवा आरोपींसह 2 लाख 71 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी विशेष मोहीम राबवून हिंगोली जिल्ह्यातील लपून छपून चालणाऱ्या अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने पोलीस पथक कार्यवाही करीत असताना माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन सेनगाव हद्दीतील कापडसिंगी येथे लायसन क्लबच्या नावाखाली जुगार चालू आहे, अशा प्रकारची माहिती मिळाली.
या संदर्भात हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. घेवारे यांच्या पथकाने दि. 20/ 6 / 2023 रोजी कापडसिंग येथील दशरथ तुकाराम साबळे राहणार कापडसिंगी यांच्या रोड लगत असलेल्या पत्राच्या शेडलगत छापा मारला असता सदर ठिकाणी लायसन क्लबच्या नावाखाली जुगार खेळणारे खालील व्यक्ती मिळून आले.
दशरथ तुकाराम साबळे (वय 54 वर्ष),संतोष गोरोबा चव्हाण (वय 50 वर्ष), अनिल श्रीरंग आडे (वय 35 वर्ष), बाबाराव श्रीरंग चव्हाण (वय 40 वर्ष), राजू उकंडी चिभडे (वय 25 वर्ष) सर्व (रा. कापडसिंगी) गोविंद काशिनाथ राठोड (वय 52 वर्ष रा. डोंगरगाव), दत्तराव यमाजी वाकळे (वय 50 वर्ष, रा. नानसी), विजय उत्तम राठोड (वय 38 वर्ष, रा. डोंगरगाव), कोंडीराम विठ्ठल बिजुले (वय 40 वर्ष, रा. डोंगरगाव) अशाप्रकारे 9 ईसम झन्नामन्ना नावाचा जुगार खेळताना मिळून आले.
त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील रोख रक्कम मोटार सायकल व मोबाईल असा 2 लाख 71 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन सेनगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे सपोनि शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, हरिभाऊ गुंजकर यांच्या पथकाने केली आहे.