मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यात मागील आठ ते नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने वार्षिक सरासरीची नोंद ओलांडली आहे. वार्षिक सरासरीच्या 55. 30 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.हिंगोली जिल्ह्यात उशिराने दाखल झालेल्या पावसाने दूर महिन्यात ओढ दिली होती.
जून महिन्यात अवघा 55 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद होती मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाचे दमदार आगमन झाले. 7 जुलैपासून पावसाची संततधार सुरू होऊन 14 जुलै रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत जिल्हाभरात किती पाऊस झाला. या पावसाने नदी-नाल्यांना मोठा पूर येऊन अनेक गावांना पुराचा फटका ही बसला. तसेच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे आत्तापर्यंत 475.40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच एवढा पाऊस झाल्याने व पावसाचे आणखी दोन महिने शिल्लक राहिल्याने यंदा पाऊस वार्षिक सरासरीच्या जास्त पडण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत झालेल्या पावसाने ेतकर्यांचे नुकसान झाले असून शेतीत पाणी साचून राहिल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. तसेच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 5.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 475.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 55.30 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज दिनांक 15 जुलै, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.
हिंगोली 3.50 (497.40) मि.मी., कळमनुरी 6.50 (562.50) मि.मी., वसमत 2.00 (497.90) मि.मी., औंढा नागनाथ 5.00 (418.10) मि.मी, सेनगांव 8.70 (375.50) मि.मी पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 475.40 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.