मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – शहरालगत असलेल्या मालवाडी येथील अनुसूया बाल विद्या मंदिर येथे 11 ऑगस्ट गुरुवार रोजी मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
हिंगोली जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने व प्रेमभावाने बहिण- भावाचे नाते घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. हिंगोली शहरालगत असलेल्या मालवाडी येथील अनुसूया बाल विद्या मंदिर येथेही बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या तसेच बहिण-भावाचे नाते घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यामंदिरातील चिमुकल्या बहिणींनी चिमुकल्या भावांना मराठी बांधून त्यांचे औक्षण केले.
अनुसूया बाल विद्या मंदिर या शाळेकडून नेहमीच स्तुत्य उपक्रम राबविले जातात विद्यालयात रक्षाबंधन हा सण साजरा झाल्याने विद्यार्थी पालकांतून आनंद व्यक्त होत असून या विद्यालयाच्या या उपक्रमाचे हिंगोली शहरातून कौतुक केले जात आहे.
या कार्यक्रमाला विद्यालयाच्या प्राचार्य मेघा फडणीस, श्री. मोरे, शिक्षिका छाया हरकळ यांच्यासह विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती