सेनगाव : जगन वाढेकर
तालुक्यातील सिंगी खांबा येथील धान्य दुकानदाराने गोरगरिबांच्या नावाला धान्य काळ्याबाजारात विक्री करून वाहनाने भरलेली गाडी गावातून रवाना केली. वाहन पकडण्यासाठी सेनगाव येथील प्रशासनाची गाडी आली; मात्र गाडी येण्याच्या आधीच धान्याने भरलेली वाहन हे मार्गस्थ झाल्याने प्रशासनातील अधिकारी कर्मचारी हात मळत बसल्याचे दिसले.
सेनगाव तालुक्यातील सिंगी खांबा येथील राशन धान्य दुकानदाराने गावातील गोरगरिबांच्या नावाने आलेला धान्य साठा हा काळ्याबाजारात नेण्यासाठी धान्य वाहनात भरण्याचा व्हिडिओ गावच्या व्हाट्सअप ग्रुप वर फिरत होता. यामध्ये तेच कट्टे तांदूळ तीच करते गहू असा माल छोटे पिकअप ज्याचा गाडी क्रमांक MH 38 BB 2318 असा असून यामध्ये भरून हामाल सदरील वाहनातून रिसोडकडे पाठवल्याचे गावच्या सरपंच यांचा मुलगा कैलास पंडितराव बूळे यांनी सांगितले. सदरील वाहनात धान्याचे कट्टे टाकताना चा व्हिडिओ गावातील ग्रामस्थांनी गावच्या व्हाट्सअप ग्रुप वर टाकला होता. सदरील व्हिडिओ कैलास बुळे यांनी सेनगाव तहसीलदार यांना पाठविला होता. यावरून पुरवठा प्रशासनाने गावात गाडी पाठविले; मात्र ही गाडी येण्याच्या आधीच सदरील वाहनातून राशन चा धान्य साठा हा रिसोड कडे नेल्याचे कैलास बुळे यांनी सांगितले.
सदरील प्रकारावरून सेनगाव तालुक्यात गोरगरिबांच्या नावाने येणारा धान्याचा काळाबाजार होत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच काळ्याबाजारात जाणारे धान्य पकडण्यात प्रशासनाला यश आले होते. त्यामुळे सेनगाव पुरवठा विभाग चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुरवठा विभाग चर्चेत आला असून पुरवठा विभागाची गाडी येण्याआधीच सिंगी खांबा येथून धान्यसाठा घेऊन जाणारी गाडी प्रशासनाच्या हाताला न लागल्याने उलट-सुलट चर्चा होत आहे.
उद्या तहसीलदारांना देणार तक्रार
सिंगी खांबा येथील धान्य दुकानदार हा कधीही गोरगरिबांच्या नावाने येणारे धान्य हे काळ्याबाजारात नेऊन विक्री करत आहेत. तसेच दुकानात गोरगरिबांच्या नावाने किती धान्य आले, किती विक्री झाले याची माहिती देत नसल्याने सर्वच अलबेल आहे. या सर्व प्रकाराबाबत उद्या सोमवार रोजी सेनगाव तहसीलदार यांना भेटून तक्रार करणार असल्याचे कैलास पंडितराव बुळे यांनी सांगितले.
तहसीलदार कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर
सिंगी खांबा येथे घडलेल्या या सर्व प्रकरणी सेनगाव तहसीलदार यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तहसीलदार जीवंकुमार कांबळे यांचा भ्रमणध्वनी कव्हर क्षेत्राच्या बाहेर येत होता.