Marmik
Hingoli live News

सणासुदीत प्रवाशांना दिलासा, खाजगी प्रवासी बस धारकांच्या मनमानीला बसणार चाप

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी:-

हिंगोली – सणासुदीच्या काळामध्ये प्रवासी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे खाजगी प्रवासी बस धारकांकडून मनमानी भाढेवाढ करण्यात येते. वास्तविक खाजगी प्रवासी बसेसने एसटी महामंडळाने विशिष्ट बस संवर्गासाठी विहित केलेल्या भाड्याच्या दिड पट पेक्षा अधिक आकारु नये , असे निर्देश परिवहन आयुक्तांनी वेळोवेळी दिलेले आहेत.

याबाबत शासनाने 27 ऑक्टोबर, 2021 रोजी शासन निर्णय जारी करुन कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. त्यानुसार कंत्राटी बसेसचे प्रती आसन कमाल भाडेदर पुढीलप्रमाणे आहे.44 प्रवासी क्षमता असलेल्या साधी बस (3×2) साठी हिंगोली येथून मुंबईसाठी 1320 रुपये, पुणे-1006, कोल्हापूर-1241, नागपूर-719, इंदौर (वाशिम मार्गे)-1006, सुरत (औरंगाबाद मार्गे)-1346, औरंगाबाद-510, हैद्राबाद-837,सोलापूर-902, अमरावती-380, अकोला-276, हिंगोली ते वाशिम-106, हिंगोली ते परभणी-171, हिंगोली ते नांदेड-197 रुपये प्रवासी भाडे आहे.  

39 प्रवासी क्षमता असलेल्या वातानुकुलीत सिटसाठी हिंगोली येथून मुंबईसाठी 1875 रुपये, पुणे-1423, कोल्हापूर-1763, नागपूर-1022, इंदौर (वाशिम मार्गे)-1422, सुरत (औरंगाबाद मार्गे)-1912, औरंगाबाद-726, हैद्राबाद-1189,सोलापूर-1282, अमरावती-1541, अकोला-393, हिंगोली ते वाशिम-152, हिंगोली ते परभणी-244, हिंगोली ते नांदेड-281 रुपये प्रवासी भाडे आहे.  44 प्रवासी क्षमता असलेल्या नॉन एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी हिंगोली येथून मुंबईसाठी 1800 रुपये, पुणे-1373, कोल्हापूर-1686, नागपूर-974, इंदौर (वाशिम मार्गे)-1373, सुरत (औरंगाबाद मार्गे)-1835, औरंगाबाद-697, हैद्राबाद-1142,सोलापूर-1248, अमरावती-520, अकोला-378, हिंगोली ते वाशिम-146, हिंगोली ते परभणी-235, हिंगोली ते नांदेड-271 रुपये प्रवासी भाडे आहे.

30 प्रवासी क्षमता असलेल्या एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी हिंगोली येथून मुंबईसाठी 2025 रुपये, पुणे-1544, कोल्हापूर-1917, नागपूर-1103, इंदौर (वाशिम मार्गे)-1544, सुरत (औरंगाबाद मार्गे)-2065, औरंगाबाद-783, हैद्राबाद-1284,सोलापूर-1384, अमरावती-583, अकोला-423, हिंगोली ते वाशिम-162, हिंगोली ते परभणी-262, हिंगोली ते नांदेड-302 रुपये प्रवासी भाडे आहे.

अधिकचे भाडे आकारल्यास आपण हिंगोली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या dyrto.38-mh@gov.in या ई-मेलवर तक्रार दाखल करावी. तसेच वरील निश्चित केलेले भाडे दर विविध ठिकाणी खाजगी प्रवासी बसेस बुकींगच्या दर्शनी भागात , बसेसमध्ये , कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेले आहेत.

शासन निर्णय दि. 27 ऑक्टोबर, 2021 नुसार खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे दर राज्य परिवहन महामंडळ यांच्या समक्ष संवर्गाच्या वाहनाच्या एकूण भाडे दराच्या दिड पट पेक्षा अधिक राहणार नाही .या अनुषंगाने हिंगोली  जिल्ह्यातील सर्व जनतेनी प्रवास करतानां खाजगी बस वाहनधारकाकडून निश्चित केलेल्या वाहनदरापेक्षा जास्त भाडेदर आकारत असतील तर आपण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या dyrto.38-mh@gov.in या ई-मेलवर तक्रार दाखल करावी, असे आवाहन अनंता जोशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Related posts

पानकनेरगाव येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी शेतकऱ्यांचा दोन तास रास्ता रोको; सेनगाव- रिसोड महामार्गावर वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

Gajanan Jogdand

हिंगोली ते पूर्णा इलेक्ट्रिक लोकोची यशस्वी चाचणी

Gajanan Jogdand

दरोडा, जबरी चोरी व घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; 6 लाख 1500 रुपयांचा मुद्देमाल जप्त! 13 गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment