Marmik
News

मुंबईकरांना गर्मीपासून दिलासा; अनेक भागात मान्सून पूर्व जोरदार पाऊस

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष आठवले :-

ठाणे – मुंबईसह उपनगरात तसेच ठाण्यातील अनेक भागात कल्याण, डोंबिवली आधी ठिकाणी दुपारी अवेळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पडत असलेल्या पावसाने येथील नागरिकांना गर्मी पासून मोठा दिलासा मिळाला आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील तापमानाचा पारा चढता राहिला आहे. वाढणाऱ्या तापमानाने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील नागरिकांना उकाड्याने पुरते हैराण करून सोडले होते.

मात्र 13 मे रोजी दुपारी तीन वाजल्यापासून मुंबईसह उपनगरात उल्हासनगर,कल्याण, डोंबिवली आदी ठाण्याच्या भागात हंगाम पूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावली. यावेळी वादळी वाऱ्यासह तसेच विजांच्या गडगडात जोरदार पावसाला सुरुवात झाली.

4:30 वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. पडत असलेल्या पावसाने येथील नागरिकांना गर्मी पासून मोठा दिलासा दिलानापासून मोठा मिळाला आहे.

Related posts

स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात

Gajanan Jogdand

खबरदार ! दहा रुपयांचे नाणे नाकाराल तर… गुन्हा दाखल करण्याचा हिंगोली जिल्हा प्रशासनाचा इशारा  

Santosh Awchar

दहावी, बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्र परिसरात मोबाईलवर बंदी! जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

Santosh Awchar

Leave a Comment