Marmik
क्राईम

हिंगोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; 17 अटक वॉरंट व एक पोटगी वॉरंट मधील व्यक्तींना पकडून न्यायालयात केले हजर

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – वॉरंट बजावणी विशेष मोहिमेत हिंगोली येथील पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत 17 अटक वॉरंट व एक पोटगी वॉरंट मधील व्यक्तींना पकडून न्यायालयात हजर केले आहे.

हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने गुन्हे प्रतिबंध व गुन्हेगारांवर वचक राहावी म्हणून विशेष कोंबिंग ऑपरेशन व प्रतिबंधक कार्यवाही तसेच अवैध धंद्याविरोधात विशेष कार्यवाहीची मोहीम राबविली जात आहे.

त्याच सोबत पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने व मार्गदर्शनात प्रत्येक आठवड्यात प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा व्हावा. न्यायालयात साक्षीदार व आरोपी हे वेळेवर समन्स व वॉरंटनुसार हजर व्हावेत यासाठी प्रयत्न केले जातात.

मात्र न्यायालयाकडून वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर हजर न राहणाऱ्या आरोपीविरुद्ध न्यायालयाकडून अजामीन पात्र व जामीन पात्र वॉरंट काढण्यात येते. सदर वॉरंटची बजावणीची विशेष मोहीम राबविण्यात येते.

4 ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत संदिपान शेळके यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत अजामीनपात्र, जामीनपात्र वॉरंट पोटगी वॉरंट बाबत विशेष मोहीम घेण्यात आली.

या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी तसेच अंमलदार सहभागी झाले होते.

या मोहिमेत विशेष कामगिरी करताना पोलिसांनी न्यायालयाकडून अनेक वेळा समन्स निघूनही तारखेवर न्यायालयात हजर न राहणाऱ्या व ज्यांच्या बाबत न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाले होते असे एकूण 17 अटक वॉरंटची बजावणी करण्यात आली.

त्यातील व्यक्तींना पकडून न्यायालया समक्ष हजर करण्यात आले तर एक पोटगी वॉरंटमधील व्यक्तीला पकडून न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले. तसेच सदर मोहिमेत वॉरंटची संबंधितांना बजावणी करण्यात आली.

Related posts

पोलिसांच्या सतर्कतेने दरोड्याचा डाव उधळला! घातक हत्यारासह तीन जण ताब्यात!!

Santosh Awchar

दहशत माजवण्यासाठी अवैधरित्या हत्यार बाळगणाऱ्या दोघांवर कारवाई

Santosh Awchar

कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांची निवड

Santosh Awchar

Leave a Comment