मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील येळेगाव गवळी येथील गोकुळ विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून उपस्थितांची वाहवा मिळवली.
स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कळमनुरी तालुक्यातील येळेगाव गवळी येथील गोकुळ विद्यालयात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.
या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थांनी चांगलीच उपस्थिती दर्शवली. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष आकर्षित झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणेही केली.
या कार्यक्रमास मार्मिक महाराष्ट्र समूहाचे सॅटॅलाइट संपादक संतोष आठवले, येळेगाव येथील तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव मंदाडे, मुख्याध्यापक आर. यु. शिंदे, इब्राहिमखा पठाण, शेख मुबारक, पंचायत समिती सदस्य संजय मंदाडे, रामदास मंदाडे, विठ्ठल मंदाडे, विकास मंदाडे, अजहर सय्यद हबीब, शेख नयूम, नारायण मंदाडे, मारुती कराळे, विकास व्यवहारे, रत्नमाजी पखरे, देवानंद ढोकणे, समाधान कांबळे, अरुण चौदते, ज्ञानेश्वर देशमुख, कपिल मगर, ब्रह्मानंद मगर, ऋषिकेश सूर्यवंशी, गजानन मंदाडे, विजय व्यवहारे, शेख आरेफ शेख सत्तार ,यांच्यासह विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित तसेच ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.