Marmik
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ विशेष नाणे काढण्याची केंद्र सरकारकडे मागणी; 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाचा पुढाकार

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-

नागपूर, नवी दिल्ली – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेकाच्या निमित्ताने  विशेष स्मारक नाणे काढून त्यामध्ये सोन्याचा वापर करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी  राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे आज केली.

वस्तू व सेवाकर परिषदेच्या 50 व्या बैठकीचे आयोजन विज्ञान भवन येथे आज करण्यात आले.  या बैठकीसाठी श्री मुनगंटीवार उपस्थित होते. बैठकीच्या मधल्या वेळात श्री मुनगंटीवार यांनी श्रीमती निर्मला सितारामन यांना निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक स्मरणार्थ जारी करण्यात येणा-या नाण्यामध्ये सोन्याचा वापर करण्याबाबत परवानगीची मागणी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे 350 वे हे वर्ष आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने राज्यभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वर्षभर साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत 2 जून 2023 रोजी भव्य  शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन किल्ले रायगडावर आठवडाभर करण्यात आले.

या उत्सवांचा एक भाग म्हणून, महाराष्ट्र शासनाने भारतीय टपाल  विभागाच्या सहकार्याने एक विशेष टपाल तिकीट नुकतेच जारी केले.  राज्याभिषेक वर्षानिमित्ताने  स्मारक नाणे जारी करण्याचा प्रस्ताव यापूर्वी केंद्रिय वित्त मंत्रालयाकडे दिलेला आहे, अशी माहिती श्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेकाच्यावेळी सोन्याचे, चांदीचे आणि तांब्याचे  “होन” काढले होते. या होनची प्रतिकृती असलेले विशेष नाणे 350 व्या राज्यभिषेकाच्या स्मरणार्थ जारी करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. हे नाणे भारतीय रिर्झव्ह बँकेच्या माध्यमातून काढून  ते जनतेला उपलब्ध करून द्यावे.

या नाण्यांनमध्ये सोन्यासह अन्य धातूंचा वापर केला जाईल असल्याचे श्री मुंगनटीवार म्हणाले.  या महत्त्वाच्या प्रस्तावाला जलद मंजुरी देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात याव्यात, अशी विनंती श्री. मुनगंटीवार यांनी केली. यावर केंद्रीय वित्त मंत्री यांनी सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.

Related posts

पूरस्थिती : कुरुंदा व परिसरात जिल्हा प्रशासनाकडून मदत कार्य सुरू

Gajanan Jogdand

आरोग्य केंद्र उठले ग्रामस्थांच्या जीवावर! रुग्णांना दिली जाताहेत एक्सपायरी औषधी!! जिल्हा आरोग्य यंत्रणेचे नियंत्रण नाही

Gajanan Jogdand

रानकवी विसावला! पद्मश्री ना. धो. महानोर यांचे निधन

Gajanan Jogdand

Leave a Comment