Marmik
News महाराष्ट्र

निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार क्षेत्रीय डाक जीवन विमा अधिकारी म्हणून काम करण्याची संधी

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – परभणी डाक विभागाकडून डाक जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) योजनेअंतर्गत “क्षेत्रीय डाक जीवन  विमा अधिकारी’’  (Field Officer)  म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.

यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छूक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज दि. 30 ऑगस्ट, 2022 रोजी कार्यालयीन वेळेत (11.00 17.00) अधीक्षक डाकघर, परभणी विभाग, परभणी- 431401 येथे थेट मुलाखतीसाठी हजर राहावे व सोबत बायोडाटा, मूळ कागदपत्र, प्रमाणपत्र/सेवामुक्ती प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे.यासाठी उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 65 वर्ष असावे.

अर्जदार हा केंद्र किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही खात्याचा निवृत्त अधिकारी, कर्मचारी असावा. तसेच त्याच्यावर कुठल्याही प्रकारची विभागीय, शिस्तभंगाची कारवाई चालू नसावी. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विमा बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती आदी बाबींचे ज्ञान तपासले जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी NSC/KVP च्या स्वरुपात असेल.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो IRDA ची परवाना परीक्षा उतीर्ण केल्यानंतर कायम स्वरुपाच्या परवानामध्ये रुपांतरीत केली जाईल. ही परीक्षा 3 वर्षाच्या आत उतीर्ण करणे अनिवार्य राहील. उमेदवाराची नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर राहील, असे डाकघर अधीक्षक, परभणी विभाग, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Related posts

जि. प. व पं. स. सार्वत्रिक निवडणूक ; 28 जुलै रोजी आरक्षण निश्चित

Santosh Awchar

पेरणीसाठी स्वतःचीच जमीन मिळेना; तहसीलदारांच्या आदेशांना मंडळ अधिकार्‍यांकडून केराची टोपली

Jagan

आमदार मुटकुळ्यांच्या मतदारसंघात शिक्षणाचा काळाबाजार! एआरटीएम इंग्लिश स्कूलकडून सीबीएसईच्या नावाखाली पालकांना गंडवण्याचे काम जोमात सुरू

Gajanan Jogdand

Leave a Comment