मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी
हिंगोली – औंढा नागनाथ तालुक्यातील वडचुना येथील सेवानिवृत्त पोलीस पाटील तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष झब्बूसिंग मिठू नाईक राठोड यांचे 20 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
औंढा नागनाथ तालुक्यातील वडचुना येथील सेवानिवृत्त पोलीस पाटील तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष झब्बूसिंग मिठू नाईक राठोड ( वय 70 वर्ष) हे मनमिळावू स्वभावाचे होते. 20 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली असून त्यांच्या पार्थिवावर 21 मे रोजी सकाळी 10 वाजता वडचुना येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.