Marmik
Hingoli live

महसूल पंधरवाडा : 34 जणांना तलाठी पदावर नियुक्ती

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्हा सरळ सेवा भरती २०२३ च्या अनुषंगाने ३४ तलाठी उमेदवारांना तत्कालिन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते सोमवार (दि.५) रोजी नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या आस्थापनेवरील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जमाबंदी आयुक्त, तथा संचालक भूमि अभिलेख यांच्यामार्फत एकूण ७६ रिक्त पदांची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.

जिल्हा निवड समितीमार्फत गुणाणुक्रमे निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करुन पात्र ठरलेल्या २९ उमेदवारांना १५ मार्च २०२३ रोजी व ३४ उमेदवारांना ५ ऑगस्ट  २०२४ रोजी असे एकूण ६३ उमेदवारांना महाराष्ट्र शासन, महसूल विभाग यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘महसूल पंधरवाडा’चे औचित्य साधून तलाठी पदावर नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती, हिंगोली यांच्या हस्ते दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

क्षेत्रीय स्तरावर तलाठी हा महसूल विभागाचा महत्वाचा कणा असून क्षेत्रीय स्तरावर जनतेला शासनाच्या विविध योजनेचा लाभ तसेच इतर महत्वाच्या सेवा जलदगतीने मिळण्यास उक्त रिक्त पदे भरल्यामुळे निश्चित मदत होईल, असे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Related posts

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांची निवड

Santosh Awchar

हिंगोली शहर हद्दीत एक लाख 14 हजार 900 रुपयांचा गुटख्यासह मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Santosh Awchar

संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर रंगला एकता चषक क्रिकेट सामना

Santosh Awchar

Leave a Comment