मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील जिल्हाधिकारी कार्यालयात 31 मार्च रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली डीएपीसीसी, इएमटीसीटी व डीसीसी आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, ADHO डॉ. शेळके, DTO डॉ. मिरदुडे, ART MO डॉ. कोठुळे, समाज कल्याण अधिकारी येडके, जिल्हा माहिती अधिकारी कारभारी, एक खिडकी योजनेचे नायब तहसिलदार जोशी, सरकारी कामगार अधिकारी कराड , विहान PC अलका रणवीर, TI NGO च्या भगत, डापकुचे आशिष पाटील, संजय पवार, टिना कुंदणानी व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्ह्यातील HIV/AIDS कार्यक्रमाचा आढावा सादर केला.
PLHIV व FSW यांना सर्व प्रकारच्या शासकिय लाभाच्या योजना मिळवून देण्यासाठी पुढील महिन्यात सर्व नायब तहसीलदार यांची मीटिंग लावून उर्वरित सर्व प्रस्ताव निकाली काढण्यात यावे असे निर्देश माननीय जिल्हाधिकारी यांनी दिले.