मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क /प्रतिनिधी :-
हिंगोली – कळमनुरी येथे लहुजी शक्ती सेनेची नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मातंग समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात वहा पोह करून सदरील प्रश्न सोडविण्या संदर्भात चर्चा केली.
अनुसूचित जाती प्रवर्गातील मातंग समाज महाराष्ट्रात अत्यंत, शोषित, गरीब, वंचित म्हणून ओळखला जातो. सदरील समाजावर वारंवार अन्याय अत्याचार होतो. सदरील अन्याय – अत्याचाराच्या घटना स्थानिक पातळीवर दाबल्या जातात. त्या उघडकीस येत नाहीत.
तसेच समाजात शिक्षण व्यक्तींचे हक्क या संदर्भात हा समाज अनभिज्ञ आहे. सदरील समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात तसेच सदरील प्रश्न सोडविण्या संदर्भात कळमनुरी येथे पार पडलेल्या लहुजी शक्ती सेनेच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष संदेश शिखरे शिवाजी महाराज गजभारे आठवले गटाचे मराठवाडा संघटक दत्तराव गायकवाड लहुजी शक्ती सेना कळमनुरी तालुका अध्यक्ष केशव लांडगे लहुजी शक्ती सेना युवक जिल्हा अध्यक्ष चेतन पाटोळे हिंगोली तालुका अध्यक्ष अनिल ढोके हिंगोली शहराध्यक्ष संतोष घोंगडे आदींची उपस्थिती होती.
बैठकीस मोठ्या संख्येने लहुजी शक्ती सेनेच्या सर्व पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या. तसेच नागरिकांची ही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.