Marmik
Hingoli live

कळमनुरी कडे जाणारा रस्ता 60 दिवसासाठी बंद ! रेल्वे ब्रिजचे काम सुरू असल्याने पर्यायी मार्गाची व्यवस्था

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – शहरातून कळमनुरी कडे जाणाऱ्या रोडवरील गेट नंबर 144 बी येथे रेल्वे ब्रिजचे काम सुरू असल्याने प्रवासासाठी सदरचा रस्ता पुढील साठ दिवसासाठी बंद करण्यात आला आहे. तसेच कळमनुरी शहराकडे जाणारा पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली आहे.

हिंगोली शहरातील कळमनुरी कडे जाणाऱ्या रोडवरील रेल्वे गेट नंबर 144 बी येथे रेल्वे ब्रिजचे काम सुरू आहे. सदर रेल्वे गेट परिसरात चे काम सुरू असल्याने एम आर आय डी सी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी या ठिकाणी पुढील साठ दिवसासाठी रेल्वे गेट पासून सध्या कार्यरत रहदारीचे मार्ग बंद करून त्यांनी तात्पुरते वाहतुकीसाठी नवीन तयार केलेल्या पर्यायी मार्गाचा वापराबाबत विनंती केल्यानुसार हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ख) अन्वय 6 ऑक्टोबर रोजी आधी सूचना काढून दि. 8 ऑक्टोबर पासून पुढील 60 दिवसांसाठी सध्या कार्यरत रेल्वे गेट नंबर 144 B येथील वाहतुकीचा रस्ता बंद करून वाहतुकीसाठी नवीन पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

यानुसार मोठे वाहने जि हिंगोली शहरातून कळमनुरी कडे जाणारे ते हिंगोली शहरातून पुढे अकोला बायपास गारमाळ वरून खटकाळी बायपास त्याच मार्ग कळमनुरी कडून हिंगोली शहरात येणारे जे मोठे वाहने आहेत.

ते खटकाळी बायपास येथून गारमाळ – पुढे अकोला बायपास येथून हिंगोली शहरात येतील. तर लहान चार चाकी व दुचाकी वाहने सदर रेल्वे गेट शेजारी तात्पुरता निर्माण केलेल्या पर्यायी मार्गाने जातील ज्यात हिंगोली कडून कळमनुरी कडे जाणारे वाहनांचा समावेश आहे.

त्यांनी नवीन बनत असलेल्या रेल्वे पूल – त्या खालून उजव्या बाजूने जीनमाता नगर मधील सिमेंट रस्ता – पुढे नवीन पर्यायी बनविलेला कच्चा रस्ता समोर जाऊन रेल्वे भुयारी पूल – पुढे खटकाळे हनुमान मंदिर खटकाळी बायपास असा मार्ग असेल तर कळमनुरी कडून हिंगोली शहरात येणाऱ्या चार चाकी व दुचाकी वाहने हे खटकाळी बायपास येथून पुढे खटकाळे हनुमान मंदिर- पुढे समोर जाऊन उजव्या बाजूने नवीन पर्यायी बनविलेला कच्चा रस्ता -समोर जाऊन रेल्वे भुयारी पूल – पुढे जीनमाता नगर मधील सिमेंट रस्त्याने हिंगोली शहरात जातील असा नवीन पर्यायी वाहतूक मार्ग आहे.

सदर ठिकाणावरून प्रवास करणारे सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच नमूदकाळात रेल्वे गेट व खटकाळी बायपास पासून तयार केलेल्या नवीन पर्यायी मार्गाने प्रवास करताना सुरक्षितरीत्या व वाहतूक कोंडी होणार नाही. याची खबरदारी घेऊन प्रवास करावा एम आर आय डी सी यांच्याकडून नागरिकांच्या सुविधेसाठी सदर नवीन पर्यायी मार्गावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक व फ्लागमॅन ची नेमणूक करण्यात येणार आहे.

Related posts

हट्टा पोलिसांची विशेष कामगिरी: बारा तासात चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद, मुद्देमाल ही हस्तगत

Santosh Awchar

जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा

Santosh Awchar

अग्नीपथ योजनेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध; सेनगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन

Gajanan Jogdand

Leave a Comment