मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय हिंगोली यांच्या तर्फे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त हिंगोली येथील आदर्श महाविद्यालय येथे जिल्हास्तरीय रोल प्ले स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास आघाव हे होते तर जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेत प्रथम पारितोषिक शिवाजी महाविद्यालय हिंगोली, व्दितीय पारितोषिक शासकीय नर्सिंग महाविद्यालय, हिंगोली, तृतीय पारितोषिक आदर्श महाविद्यालय, हिंगोली तर उत्तेजनार्थ श्रावणी नर्सिंग स्कूल, वसमत यांनी पटकावले. विजेत्या टीमला प्राचार्य डॉ. विलास आघाव व जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.
यावेळी सदरील स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राचार्य श्रीमती वर्षा खंदारे, प्रा. डॉ. नगरकर, प्रा. संगीता मुंडे यांनी काम पाहिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय पवार व बालाजी चाफाकानडे यांनी परिश्रम घेतले.