Marmik
क्राईम

मोटार सायकल पळविणारा ‘रन’ ‘वीर’ जेरबंद! 20 मोटारसायकल जप्त

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या इसमास पकडून जेरबंद केले आहे. दिनेश उत्तम रणवीर असे या व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीच्या ताब्यातून वीस मोटार सायकल (किंमत अंदाजे 11 लाख 90 हजार रुपये) जप्त करण्यात आल्या.

हिंगोली जिल्ह्यात अनेक मोटार सायकल चोरी गेल्याच्या घटना घडल्या होत्या. याबद्दल जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. नमूद मोटार सायकल चोरी करणारी टोळीला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले होते.

हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सदर मोटार सायकलचे गुन्हे उघड करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना सूचना देऊन पथके स्थापन केले होते.

पोलीस पथकाने घटनास्थळाला भेट देऊन बारकाईने पाहणी करून गोपनीय माहिती काढली असता आरोपी नामे दिनेश उत्तम रणवीर (वय 23 वर्ष व्यवसाय मजुरी रा. पाचोंदा ता. माहूर जि. नांदेड) याने त्याच्या इतर साथीदारासह विविध भागातून मोटार सायकल चोरी केल्या असून चोरी केलेल्या मोटर सायकल कमी किंमतीत विक्री केल्या आहेत, अशी गोपनीय माहिती मिळाली.

या अनुषंगाने पोलीस पथकाने आरोपीचा शोध घेऊन दिनेश उत्तम रणवीर यास ताब्यात घेतले त्याच्याकडे विचारपूस केले असता आरोपीने त्याच्या इतर साथीदारासह मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

सदर आरोपीच्या ताब्यातून एकूण 20 मोटार सायकल किंमत अंदाजे 11 लाख 90 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस ताब्यात घेऊन हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. सदरील आरोपीने नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातही मोटार सायकल चोरी केल्या आहेत.

ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, पोलीस अंमलदार सुनील अंभोरे, लिंबाजी वावळे, प्रेम चव्हाण, किशोर सावंत, महादू शिंदे, विशाल खंडागळे, निरंजन नलवार, दत्ता नागरे, शेख इरफान यांनी केली.

Related posts

हापसापुर शिवारात गांजाची शेती! 10.80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बाप – लेक ताब्यात

Santosh Awchar

पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अंमलदाराने घेतली 5 हजार रुपयांची लाच; आरोपीस अटक

Gajanan Jogdand

आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्या एका फेसबुक वापरकर्त्यासह 14 व्हाट्सअप वापरकर्त्यावर कार्यवाही

Santosh Awchar

Leave a Comment